शिरोडकरांच्या 70 कोटींच्या जमिनीप्रकरणी लोकायुक्तांसमोर बुधवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 08:14 PM2018-11-13T20:14:45+5:302018-11-13T20:15:11+5:30

माजी मंत्री व शिरोडय़ाचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याशीसंबंधित 70 कोटी रुपयांच्या जमीन संपादन प्रकरणी लोकायुक्तांसमोर  बुधवारी पहिली सुनावणी होणार आहे. 

The hearing on Shirodkar's 70 crore land in front of the Lokayuktas | शिरोडकरांच्या 70 कोटींच्या जमिनीप्रकरणी लोकायुक्तांसमोर बुधवारी सुनावणी

शिरोडकरांच्या 70 कोटींच्या जमिनीप्रकरणी लोकायुक्तांसमोर बुधवारी सुनावणी

Next

पणजी - माजी मंत्री व शिरोडय़ाचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याशीसंबंधित 70 कोटी रुपयांच्या जमीन संपादन प्रकरणी लोकायुक्तांसमोर  बुधवारी पहिली सुनावणी होणार आहे. 

सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली आहे. तक्रारीत त्यांनी शिरोडकर यांच्यासह मुख्यमंत्री मनोहर र्पीकर व मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांच्याही नावाचा समावेश केला आहे. शिरोडा येथील जमीन 7क् कोटी रुपये खर्च करून सरकारने ताब्यात घेतली आहे. लोकायुक्तांनी याबाबत मुख्य सचिवांना नोटीस पाठवून जमीन खरेदी-विक्री तथा भूसंपादनविषयीची सगळी माहिती सादर करण्यास सांगितले आहे. गेल्या 16 ऑक्टोबर रोजी शिरोडकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांना 70 कोटींच्या सरकारी भू-संपादनाद्वारे प्रचंड लाभ झाला असे रॉड्रीग्ज यांचे म्हणणो असून हा लाभ सरकारी गैरव्यवस्थापनामुळे झाला असेही त्यांनी नमूद केले आहे. सरकारने सुभाष शिरोडकर यांच्या कंपनीकडून 1 लाख 83 हजार 534 चौरस मीटर क्षेत्रफळाची शिरोडा येथील जागा संपादित केली. र्पीकर यांच्या आशीर्वादाने व संगनमताने ही सगळी प्रक्रिया पार पडली, असा दावा रॉड्रीग्ज यांनी केला आहे. भाजपसोबत मैत्री करण्यासाठी शिरोडकर यांना 7क् कोटींच्या भू-संपादनाचे बक्षिस दिले गेले, असे रॉड्रीग्ज यांनी म्हटले आहे. शिरोडकर यांना खूपच जास्त प्रमाणात जमिनीचा दर दिला गेला असे रॉड्रीग्ज यांचे म्हणणो असून सरकारने बेकायदा पद्धतीने केलेल्या सगळ्य़ा  प्रक्रियेची चौकशी व्हावी अशी मागणी रॉड्रीग्ज यांनी केली आहे. 

दरम्यान, शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी जमीन विक्रीतून मिळालेले 70कोटी रुपये हे आपले हक्काचे आहेत, असे म्हटले आहे.

Web Title: The hearing on Shirodkar's 70 crore land in front of the Lokayuktas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा