नीतेश राणेंच्या इशाऱ्यांनी भीक घालणार नाही, गोव्यातील मंत्री आणि आमदारांचे प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 11:53 PM2018-11-03T23:53:45+5:302018-11-03T23:55:06+5:30

नारायण राणे यांचाही गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे. सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे.

Goa's ministers and MLAs reply to Nitesh Rane | नीतेश राणेंच्या इशाऱ्यांनी भीक घालणार नाही, गोव्यातील मंत्री आणि आमदारांचे प्रतिआव्हान

नीतेश राणेंच्या इशाऱ्यांनी भीक घालणार नाही, गोव्यातील मंत्री आणि आमदारांचे प्रतिआव्हान

googlenewsNext

पणजी -गोव्यात मासळी आयातीच्या प्रश्नावर सरकारने कडक निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे यांनी गोवा पासिंगचे एकही वाहन सिंधुदुर्गातून जाऊ देणार नाही, असा जो इशारा दिला आहे, त्याचा गोव्यातील मंत्री, आमदारांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही इशाऱ्याला किंवा दबावाला गोवा सरकार बळी पडणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. 

सरकारात घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनीही गोव्याने मासळी आयातीबाबत कडक पावले का उचलली याचा नितेश राणे यांनी आधी गांभीर्याने विचार करावा, असे म्हटले आहे.

शिवसेनेचे गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी नितेश राणे यांच्या या विधानाचा निषेध करताना नारायण राणे यांचाही गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे,याकडे लक्ष वेधले आहे. अशा प्रकारच्या धमक्या देऊ नयेत, असे ते म्हणाले. शेजारी सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे असे कामत यांनी म्हटले आहे.

आयात मासळी टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मेलीन रसायनाचा वापर केला जातो हे रसायन मानवी आरोग्यास धोकादायक आहे. गेल्या १२ जुलै रोजी मडगाव येथे घाऊक मासे बाजारात हा प्रकार आढळून आल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली होती. अन्न व औषध प्रशासनाची नोंदणी तसेच मासे व वाहन इन्सुलेटेड असल्याशिवाय गोव्यात मासळी आयात करता येत नाही. या दोन्ही गोष्टी नसल्यास सीमेवरच मासळीवाहू वाहने अडवून परत पाठवली जात आहेत.

Web Title: Goa's ministers and MLAs reply to Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.