गोवा शिपयार्ड पुढील वर्षी शेअर बाजारात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 09:50 PM2018-04-22T21:50:03+5:302018-04-22T21:50:03+5:30

गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) कंपनीने पुढील वर्षी शेअर बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. 

Goa Shipyard next year in Stock Market! | गोवा शिपयार्ड पुढील वर्षी शेअर बाजारात!

गोवा शिपयार्ड पुढील वर्षी शेअर बाजारात!

Next

- विलास ओहाळ 

पणजी - गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) कंपनीने पुढील वर्षी शेअर बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.  निरंतर बॅलन्स शिट (लेखाजोखा) आणि ऑर्डर बुकचा आकार पाहता आम्ही सार्वजनिक होण्याचा विचार करीत असल्याचे जीएसएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर मित्तल यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, कंपनीने मागील चार वर्षात नफा कमविला आहे. त्यामुळे ही कंपनी नफा कमविणारी फर्म बनली असून, या कंपनीचे 2क्13-14 मध्ये या कंपनीचे उत्पादन मुल्य 50 कोटींवर होते, ते वाढून आता 2017-18 मध्ये 1 हजार 371 कोटींवर गेले आहे. मित्तल म्हणाले की, मागील वर्षी कंपनीला एकूण दीड हजार कोटींच्या महसुलापैकी निव्वळ नफा 30 कोटींचा झाला आहे. आमची मागील काही वर्षातील एकत्रित दरवाढ 3क् टक्के असून, आमच्याकडे जहाज उत्पादनांची संख्या अधिक आहे. 

जहाजांची वेळवेर बांधणी आणि त्यांची वेळेत सुपूर्दतेमुळे हा प्रकल्प महसुलात वाढ करू शकला आहे, असे सांगत मित्तल म्हणाले की, रोल्स रॉसीसह करार केला असून, त्यात एमटीयू सिरीज 8,00 इंजीनचा समावेश आहे. समुद्रावर पेट्रोलच्या जहाजामधून गस्त घालता येणार आहे. गोव्यामध्ये 10कोटींच्या गुंतवणुकीसह जीएसएलची नवीन सुविधा असलेल्या कंपन्या 16 सिलिंडल आणि 20 सिलिंडर एमटीयू सिरीज 8,00 इंजिन एकत्र करतील, अशा पद्धतीचा हा करार असल्याचे मित्तल यांनी नमूद केले. 

नौदलासाठी उपयुक्त अशी माईन काऊंटर वेझरिंग वेसल्स आणि क्षेपणास्रसज्ज जहाजाची निर्मिती करणो हा पुढील टप्पा असून, त्यातून आमचा पाच वर्षात  5 हजार कोटींची महसूल वाढण्याची शक्यता आहे. या कंपनीने आपली क्षमता निर्मितीसाठी एक हजार कोटींची गुंतवणूक केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Goa Shipyard next year in Stock Market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.