गोवा सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे: सुरजेवाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 09:42 PM2018-11-17T21:42:42+5:302018-11-17T21:42:50+5:30

गोवा विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करायला सांगण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे.

Goa government should prove to prove majority: Surjewala | गोवा सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे: सुरजेवाला

गोवा सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे: सुरजेवाला

Next

पणजी: गोवा विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करायला सांगण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे. सरकार बहुमत गमावून बसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
लोकविश्वास गमावलेल्या गोवा सरकारने आता विधानसभेत बहुमतही गमावले असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला. या पक्षाचे आमदारही तसे बोलत आहेत. आता मंत्रीही सरकारबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. यावरूनच गोवा सरकार आता कुणाच्याच विश्वासाचे राहिलेले नाही हे सिद्ध झाले आहे. विधानसभा अधिवेश्न गेऊन गोवा सरकारने शक्ती परीक्षण करण्यास लावण्यासाठी कॉंग्रेसकडून केंद्र सरकारवर राष्ट्रीय स्तरावर दबाव आणला जाईल असेही त्यांनी सांगितले.

आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारातून लवकर बरे व्हावेत म्हणून कॉंग्रेस प्रार्थना करते आहे, परंतु खुद्द भाजपवाले त्यांच्या आजाराचा राजकीय फायदा उठवित आहेत. त्यांना केवळ मुखवटा बनवून राज्यावर अधिकार गाजवित आहेत असा आरोप त्यांनी केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी मंजुरीनंतर फाईल पुढे पाठविण्यात आल्याचे जे लिहिले जात आहेत ते बेजबाबदारपणाचे व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या मुख्यसचिवांनी जबाबदारीने वागायला हवे असे ते म्हणाले.
राज्यात प्रशासन कोलमडले आहे. बेरोजगारीने जनता त्रस्त आहे.

लोकांची कामेही अडकली आहेत अशा परिस्थितीतील या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले. खरे म्हणजे आजारपणामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: होवून मुख्यमंत्रीपद सोडायला हवे होते. फ्रान्सीस डिसोझा आणि पांडुरंग मडकईकर हे आजारी असल्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून हटविले परंतु स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही पद सोडायला तयार नाहीत, ही विसंगती असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Goa government should prove to prove majority: Surjewala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.