गोवा : कळंगुट भागात अंमली पदार्थाचे गुन्हे सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 03:26 PM2019-01-19T15:26:54+5:302019-01-19T15:27:31+5:30

वर्षाचे बाराही महिने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात अंमली पदार्थ बाळगण्याप्रकरणी नोंद करण्यात आलेल्या गुन्हेगारी प्रकरणात घट झाली आहे.

Goa: drug trafficking in Kalangut areas is highest | गोवा : कळंगुट भागात अंमली पदार्थाचे गुन्हे सर्वाधिक 

गोवा : कळंगुट भागात अंमली पदार्थाचे गुन्हे सर्वाधिक 

googlenewsNext

म्हापसा - वर्षाचे बाराही महिने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात अंमली पदार्थ बाळगण्याप्रकरणी नोंद करण्यात आलेल्या गुन्हेगारी प्रकरणात घट झाली आहे. राज्यातील इतर किनारी भागाच्या तुलनेत कळंगुट भागात अंमली पदार्थांची प्रकरणे जास्त असली तरी वाढलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारित घट होण्याचे कारण मानले जाते. 

२०१८ साली कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाई एकूण २४.४४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत ७ नायजेरियन नागरिकांसोबत १६ भारतीय मिळून २३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या अमली पदार्थांत चरसचे प्रमाण सर्वाधिक जास्त  १३.२४ लाख रुपयांचे होते. त्यानंतर गांजा ४.३० लाख, एलएसडी २.३० लाख रुपये, एमडीएमके १.५८ लाख रुपयांचा समावेश होतो.  

मागील चार वर्षांची तुलना केल्यास २०१४ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधात फक्त १६ गुन्हे नोंद केले होते. मात्र त्यानंतर २०१७ च्या वर्षात एकूण ३१ जणांवर गुन्हे नोंद करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला होता. त्यात तीन वर्षाचा आकडा मोडीत काढण्यात आलेला. २०१७ च्या तुलनेत मात्र २०१८ साली हे प्रमाण बरेच घटले आहे. मागील वर्षी नोंद करण्यात आलेल्या प्रकरणात एका नायजेरियन नागरिकाविरोधात व्यावसायिक अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणाच्या गुन्ह्याची नोंदसुद्धा करण्यात आली आहे. 

वेश्या व्यवसायात प्रवृत्त करणा-या एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून १६ मुलींची सुटका सुद्धा करुन त्यांची रवानगी अपनाघरात करण्यात आली आहे. वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणा-या १५,२५४  हजार वाहन चालकांवर गुन्हे नोंद करुन दंडाच्या रुपात त्यांच्याकडून १६.५२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. तंबाखू सेवन प्रकरणी ३५६८ तक्रारी नोंद करुन ७.१३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धुम्रपान तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या प्रकरणी ४६० तक्रारी नोंद करुन ४१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 

कळंगुट या किनारी भागातून अमली पदार्थाचे उच्चाटन करण्यास पोलीस कटिबद्ध असल्याचे मत निरीक्षक जिवबा दळवी यांनी व्यक्त केले. या किनारी भागाची व्याप्ती पाहता भागाला भेट देणारे बाहेरील नागरिक या भागात आणून त्याची विक्री करतात. त्यामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करवा लागत असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा लोकांवर कळंगुट पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले असून यावर सर्वत्र जागृती करण्यात येणार असून लोकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन दळवी यांनी केले. 

Web Title: Goa: drug trafficking in Kalangut areas is highest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.