गोवा शैक्षणिक हब बनतंय, उच्च शिक्षणाला पोषक वातावरण - मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:56 AM2018-01-10T11:56:09+5:302018-01-10T11:56:53+5:30

गोवा राज्य शैक्षणिक हब बनत आहे. उच्च शिक्षणाला पोषक असे वातावरण या राज्यात असून वार्षिक दीड हजार ते एक हजार आठशे अभियांत्रिकी पदवीधर या राज्यात तयार होत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

Goa is becoming Education hub says CM Manohar Parrikar | गोवा शैक्षणिक हब बनतंय, उच्च शिक्षणाला पोषक वातावरण - मनोहर पर्रीकर

गोवा शैक्षणिक हब बनतंय, उच्च शिक्षणाला पोषक वातावरण - मनोहर पर्रीकर

Next

पणजी - गोवा राज्य शैक्षणिक हब बनत आहे. उच्च शिक्षणाला पोषक असे वातावरण या राज्यात असून वार्षिक दीड हजार ते एक हजार आठशे अभियांत्रिकी पदवीधर या राज्यात तयार होत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे सांगितले.
नोबेल प्राईज सिरिज इंडिया-2018 हा जागतिक इवेन्ट प्रथमच गोव्यात व दुसऱ्यांदा भारतात होत आहे. येत्या दि. 1 फेब्रुवारीला या सोहळ्यास आरंभ होईल. त्यानिमित्ताने पाच ते सहा नोबेल शास्त्र गोव्याला भेट देणार आहेत. कला अकादमीत नोबेलविषयक प्रदर्शन असेल. दि. 1 ते 28 फेब्रुवारीर्पयत हे प्रदर्शन खुले राहील. या इवेन्टविषयी माहिती देण्याच्या हेतूने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बोलत होते. 

गोव्यात चार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या शिवाय सहा पॉलिटेक्नीक संस्था आहेत. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, बिट्स पिलानी आणि अन्य शैक्षणिक संस्था तसेच राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थाही (एनआयओ) गोव्यात आहे. गोव्यात विज्ञान शिक्षणाला पोषक वातावरण आहे. युवकांमध्ये विज्ञान शिक्षणविषयक प्रेम वाढावे व त्यांची विचार करण्याची क्षमता देखील विज्ञानाच्या आधारे विकसित व्हावी, त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा या दृष्टीकोनातून नोबेल प्राईज सिरिज इंडिया-2018 हा सोहळा उपयुक्त ठरेल. प्रदर्शनाचा लाभ देशभरातील मंडळींना घेता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रलयाच्या अखत्यारित येणाऱ्या बायोटेक्नोलॉजी खात्याने व गोवा सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने मिळून नोबेल मिडिया स्वीडनच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित केला आहे. स्वीडनचे नोबेलविषयक प्रदर्शन कला अकादमीत साकारेल. भारतीय संशोधकांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीचे प्रदर्शनही मांडले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विज्ञान शिक्षणाचा प्रसार होण्याच्यादृष्टीने हा सोहळा उपयुक्त ठरेलच. शिवाय जगभरातील संशोधक, नोबेल विजेते यांची भाषणो व अनुभव ऐकण्याची संधी सर्वाना मिलेल. विज्ञानविषयक चर्चासत्रे, संवाद, गोलमेज परिषद होईल. विद्याथ्र्यासह गोव्यातील शिक्षक, स्कॉलर्स यांनाही ते मदतरुप ठरेल, असे पर्रीकर म्हणाले. 

1 रोजी दुपारी साडेतीन वाजता या सोहळ्य़ाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन हेही यावेळी उपस्थित असतील. तज्ज्ञ, संशोधक आदी तीनशे मान्यवर तसेच सुमारे सातशे विद्यार्थी यात भाग घेतील. यापूर्वी गुजरातमध्ये हा सोहळा झाला होता, आता गोव्यात होत आहे, असे केंद्र सरकारचे सचिव विजय राघवन यांनी सांगितले. या सोहळ्य़ानिमित्ताने विविध चर्चासत्रे, व्याख्याने वगैरे कला अकादमीसह राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, तसेच फोंड्यातील कला मंदीर, मडगावचे रविंद्र भवन आणि अन्य ठिकाणी होणार आहे.

Web Title: Goa is becoming Education hub says CM Manohar Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.