मुरगावात यंदा गुन्हेगारी कमी पण गुन्ह्यांचा छडा लावण्यास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:28 PM2018-12-22T17:28:38+5:302018-12-22T17:28:47+5:30

मुरगाव तालुक्यात मागील वर्षापैक्षा २०१८ सालात विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रमाणात कमतरता झाली असली तरी ह्या वर्षी गुन्हेगारी प्रकरणाचा छडा लावण्यास पोलीस मागील वर्षापैक्षा यंदा कमी पडल्याचे दिसून आले.

Failure to investigate crimes in Murga but lesser crimes | मुरगावात यंदा गुन्हेगारी कमी पण गुन्ह्यांचा छडा लावण्यास अपयश

मुरगावात यंदा गुन्हेगारी कमी पण गुन्ह्यांचा छडा लावण्यास अपयश

Next

- पंकज शेट्ये


वास्को: मुरगाव तालुक्यात मागील वर्षापैक्षा २०१८ सालात विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रमाणात कमतरता झाली असली तरी ह्या वर्षी गुन्हेगारी प्रकरणाचा छडा लावण्यास पोलीस मागील वर्षापैक्षा यंदा कमी पडल्याचे दिसून आले. २०१७ सालात मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा, मुरगाव, वास्को रेल्वे पोलीस व दाबोळी विमानतळ पोलीस अशा विविध पोलीस स्थानकावर २५७ विविध गुन्हेगारी प्रकरण नोंद झाली असून ह्या वर्षाच्या सुरवातीपासून अजून पर्यंत येथे २३२ विविध गुन्हेगारींची प्रकरणे नोंद झाली आहे. मुरगाव तालुक्यातील विविध पोलीस स्थानकावर मागच्या वर्षी नोंद झालेल्या विविध गुन्हेगारी प्रकरणातील २३२ प्रकरणांचा छडा लावण्यास पोलीसांना यश आले असून ह्या वर्षात येथील पोलीसांनी २१५ गुन्हेगारी प्रकरणाचा छडा लावला आहे.


मुरगाव तालुक्यात वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी अशा गोव्याच्या चार मतदारसंघाचा समावेश आहे. ह्या तालुक्यात वास्को, वेर्णा, मुरगाव, वास्को रेल्वे व दाबोळी विमानतळ पोलीस स्थानके कार्यरत असून २०१८ वर्षाच्या सुरवातीपासून अजून येथे २३२ विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैंकी २१५ प्रकरणांचा छडा लावून ह्या गुन्ह्यात शामील असलेल्या आरोपींना गजाआड करण्यास पोलीसांना ह्या वर्षात अजून यश प्राप्त झाले आहे. मागच्या वर्षी येथील विविध पोलीस स्थानकावर २५७ विविध गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलीसांनी यापैंकी २३२ गुह्यांचा छडा लावून आरोपींना गजाआड केले होते. खून, विविध प्रकारच्या चोऱ्या, बलात्कार, फसवणूक, अपहरण, वेश्या व्यवसाय, अमली पदार्थ हाताळणे अशा विविध गुन्ह्यांची ह्या वर्षी मुरगाव तालुक्यातील वास्को पोलीस स्थानकावर सर्वात जास्त नोंद झाली असून असे १३१ गुन्हो २०१८ सालाच्या सुरवातीपासून अजून पर्यंत येथे नोंद झाले आहेत. त्यापैंकी १२१ प्रकरणाचा छडा वास्को पोलीसांनी लावलेला असून राहीलेल्या १० प्रकरणाचा अजूनही तपास चालू आहे.

ह्या वर्षात वेर्णा पोलीस स्थानकावर ७० विविध गुन्हेगारी प्रकरणे नोंद झाली असून ६५ प्रकरणांचा पोलीसांनी छडा लावला आहे. मुरगाव पोलीसात २४ पैंकी २२ प्रकरणात छडा लावला असून वास्को रेल्वे पोलीस स्थानकात नोंद झालेल्या १ व दाबोळी पोलीस स्थानकात नोंद झालेल्या ६ गुन्हेगारी प्रकरणाचा १०० टक्के छडा लावण्यास ह्या पोलीस स्थानकांना यश प्राप्त झाले आहे. मागच्या वर्षी (२०१७ मध्ये) मुरगाव तालुक्यात तीन खून प्रकरणे नोंद झाली असून ह्या वर्षात चार खून प्रकरणे नोंद झाली आहेत. २०१८ सालात वास्को पोलीस हद्दीत झालेल्या एका व वेर्णा पोलीस हद्दीत झालेल्या तीन खून प्रकरणांचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्यास पोलीसांना १०० टक्के यश आले आहे. ह्या वर्षात मुरगाव तालुक्यात घरफोडी, दुकानफोडी, वाहनांची चोरी इत्यादी अशा ५३ विविध चोरींच्या घटना घडलेल्या असून यापैंकी ३९ प्रकरणांचा छडा लावून चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस यशस्वी ठरलेले आहेत. यात वास्को पोलीस हद्दीत ३७, वेर्णा ८, मुरगाव ७ व रेल्वे पोलीस हद्दीत १ चोरीच्या प्रकरणाचा समावेश आहे. ह्या वर्षात वास्कोत ६, वेर्णा ३ व मुरगाव पोलीस हद्दीत १ बलात्काराची घटना घडली असून सर्व प्रकरणात आरोपींना जेरबंद करण्यास पोलीसांना यश आले आहे.

२०१७ सालात मुरगाव तालुक्यात ८ बलात्काराच्या घटना घडल्या असून ह्या वर्षी त्यात वाढ होऊन १० बलात्कार प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे. मागील वर्षापैक्षा यंदा अपहरण प्रकरणातही वाढ झाल्याचे दिसून आले असून वास्कोत ८, वेर्णा २ तर मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत ३ अपहरणाच्या घटना ह्या वर्षात घडल्या. यापैंकी फक्त एका प्रकरणाचा शोध लावण्यास वास्को पोलीसांना अजून पर्यंत यश आलेले नाही. ह्या वर्षी १७ विविध घटनेत कारवाई करून गांजा इत्यादी अमली पदार्थ हाताळणाºयांना पोलीसांनी गजाआड केले असून यापैकी १२ वास्को, ४ वेर्णा व १ मुरगाव पोलीसांची कारवाई आहे. याबरोबरच मुरगाव तालुक्यातील विविध पोलीस स्थानकावर वर्षाच्या सुरवातीपासून अजून पर्यंत फसवणूक, मारहाण अशा प्रकारची विविध प्रकरणे नोंद झाली आहेत. मागच्या वर्षापैक्षा (२०१७) ह्या वर्षात मुरगाव तालुक्यातील विविध पोलीस स्थानकावर नोंद झालेली गुन्हेगारीची प्रकरणे कमी असलीतरी ह्या प्रकरणांचा छडा लावण्यास येथील पोलीस मागच्या वर्षापैक्षा थोड्या प्रमाणात मागे पडल्याचे दिसून येते.

यंदा चोरट्यांनी मुरगाव तालुक्यातून १ कोटी ६९ लाख ५९ हजार ५९२ रुपयांची मालमत्ता केली लंपास
मुरगाव तालुक्यातील विविध पोलीस स्थानकावर ह्या वर्षात ५३ विविध चोरी प्रकरणांची नोंद झाली असून यांपैकी ३९ प्रकरणातील चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. सदर चोरी प्रकरणात तब्बल १ कोटी ६९ लाख ५९ हजार ५९२ रुपयांची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली असून यापैंकी फक्त २९ लाख ३७ हजार ७९६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यास पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. मागच्या वर्षी (२०१७ मध्ये) मुरगाव तालुक्यातील विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीतून झालेल्या ५० चोरीच्या प्रकरणात ५७ लाख १८ हजार ६१९ रुपयांची मालमत्ता लंपास केलेली असून यापैंकी ३४ लाख ४३ हजार ८८० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यास पोलीसांना यश आले होते. ह्या वर्षात चोरीला गेलेल्या मालमत्तेची सर्वात जास्त रक्कम वास्को पोलीस हद्दीत असून येथून चोरट्यांनी १ कोटी ५३ हजार ८६२ रुपयांची मालमत्ता पळवली आहे. यापैंकी फक्त २५ लाख ९१ हजार ४५५ रुपयांची मालमत्ता पोलीसांनी चोरट्यांना जेरबंद करून जप्त केली आहे. वेर्णा पोलीस हद्दीतून १२ लाख ६१ हजार ३६४ रुपयांची मालमत्ता लंपास केली असून चोरट्यांना गजाआड करून पोलीसांनी यापैंकी १ लाख ७१ हजार ३७१ रुपयांची मालमत्ता जप्त केली. मुरगाव पोलीस हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणात २ लाख ९२ हजार ३८७ रुपयांची ह्या वर्षी मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली असून चोरट्यांना गजाआड केल्यानंतर यापैंकी १ लाख ६४ हजार ९९० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. रेल्वे पोलीस हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणात १२ हजार ९८० रुपयांची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली असून त्यापैंकी ९९८० रुपयांची मालमत्ता नंतर जप्त करण्यास पोलीसांना यश आले.   

२४ जणांचा अपघातात बळी
मागच्या वर्षापैक्षा ह्या वर्षी मुरगाव तालुक्यात अपघातात मरण पोचण्याच्या संख्येत वाढ झालेली असून २०१८ च्या सुरवातीपासून अजून पर्यंत २४ जणांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला आहे. २०१७ मध्ये मुरगाव तालुक्यातील विविध भागात झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून यंदा ही संख्या २४ वर पोचली आहे. ह्या वर्षात वास्को पोलीस स्थानकाच्या हद्दीत ९, वेर्णा १४ तर मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत १ जणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. 

Web Title: Failure to investigate crimes in Murga but lesser crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.