कर्नाटकला पिण्यासाठी म्हादईचे पाणी देणे तत्त्वत: मान्य - पर्रिकर  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 06:09 PM2017-12-21T18:09:34+5:302017-12-21T18:25:35+5:30

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील दुष्काळग्रस्त भागांना पिण्यासाठी देणो आम्हाला तत्त्वत: मान्य आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी पिण्यासाठी मागितले असून आम्ही कर्नाटकच्या विनंतीविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करू.

Due to water supply to Karnataka for drinking water, Valid - Parrikar | कर्नाटकला पिण्यासाठी म्हादईचे पाणी देणे तत्त्वत: मान्य - पर्रिकर  

कर्नाटकला पिण्यासाठी म्हादईचे पाणी देणे तत्त्वत: मान्य - पर्रिकर  

Next

पणजी - म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील दुष्काळग्रस्त भागांना पिण्यासाठी देणो आम्हाला तत्त्वत: मान्य आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी पिण्यासाठी मागितले असून आम्ही कर्नाटकच्या विनंतीविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करू. आम्ही कोणताच निर्णय घेतलेला नाही पण कर्नाटकच्या मागणीविषयी चर्चा करण्याची गोवा सरकारची तयारी आहे, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर
केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी दिल्लीत एक बैठक घेतली. त्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांच्यासह कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा सहभागी झाले. मुख्यमंत्री र्पीकर यांनीही त्या बैठकीत भाग घेतला. कर्नाटकला म्हादई नदीचे पाणी पिण्यासाठी हवे आहे व ते पाणी गोव्याने द्यावे अशी विनंती त्या बैठकीत येडीयुरप्पा यांनी मांडली. मुख्यमंत्री र्पीकर यांनी गुरुवारी येडीयुरप्पा यांना पत्र लिहिले व तुमच्या मागणीविषयी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी येडीयुरप्पा याना कळविले. मुख्यमंत्र्यांनी गोवा म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यानाही गुरुवारी सकाळी स्थितीची आणि कर्नाटकच्या मागणीची कल्पना दिली. सायंकाळी आल्तिनो येथील आपल्या शासकीय बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन येडीयुरप्पा याना लिहिलेल्या पत्रची प्रत जाहीर केली. तसेच पिण्यासाठी कर्नाटकला पाणी देण्यास आमचा कधीच विरोध नव्हता, 2क्क्2 साली देखील आपली तशीच भूमिका होती, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.
र्पीकर म्हणाले, की कर्नाटकमधील काही भागांमध्ये दुष्काळग्रस्त स्थिती असते. त्या भागाला म्हादई नदीचे पाणी पिण्यासाठी हवे आहे. आम्ही ते देतो असे सांगितलेले नाही पण त्या मागणीविषयी सहानुभूतीपूर्वक आणि माणुसकीच्या दृष्टीकोनातून कर्नाटकशी चर्चा केली जाईल. किती प्रमाणात पाणी द्यावे व ते कशा प्रकारे द्यावे हे कर्नाटकशी चर्चा झाल्यानंतरच ठरेल. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे येडीयुरप्पा याना गुरुवारी पत्र लिहून आपण कळवले आहे. पिण्याच्या पाण्याच्या वापराविषयी दोन्ही राज्यांमध्ये जो करार होईल, तो करार म्हादई पाणी तंटा लवादासमोरही मांडला जाईल. कदाचित प्रत्यक्षात करार होईल तेव्हा कर्नाटकमधील निवडणुकाही झालेल्या असतील व काँग्रेस सरकार जाऊन तिथे भाजपचे सरकारही आलेले असेल.
मुख्यमंत्री म्हणाले, की शहा यांनी दबाव आणलेला नाही. काहीवेळा प्रकाश जावडेकर व येडीयुरप्पा हे देखील माङयाशी म्हादईचे पाणी मिळावे याविषयी बोलले होते. अध्यक्ष शहा यांच्या उपस्थितीत बैठक व्हावी अशी माझीच भूमिका होती. या बैठकीचे निमंत्रिण तीन-चार दिवसांपूर्वी आले होते. पिण्याचे पाणी कर्नाटकला द्यावे ही भूमिका तत्त्वत: आम्हाला पटते. फक्त पिण्यासाठीच म्हादईचे पाणी देण्याच्या विषयाबाबत आम्ही कर्नाटकशी चर्चा करू. लवादासमोर जो खटला आहे, त्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. लवादासमोर जे काही ठरेल, त्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही व करणार नाही. आम्ही कर्नाटकला पिण्यासाठी पाणी देण्याबाबत चर्चा करताना गोव्याच्या हिताविषयी तडजोड करणार नाही. कारण आपणच म्हादईप्रश्नी गंभीरपणो कर्नाटकविरुद्ध लढत आहे. पिण्याच्या पाण्याविषयी दोन्ही राज्ये मिळून जर सामोपचाराने तोडगा काढत असतील तर तो काढावा असे एकदा पाणी तंटा लवादानेही गोवा व कर्नाटकला सूचविले होते. येडीयुरप्पा याना पत्र लिहिताना आपण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नाडकर्णी यांचीही मान्यता कायद्याच्यादृष्टीकोनातून घेतली आहे. कारण म्हादईप्रश्नी लवादासमोर गोव्याच्यावतीने ते ज्येष्ठ वकील या नात्याने युक्तीवाद करत आहेत.

Web Title: Due to water supply to Karnataka for drinking water, Valid - Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.