ड्रग्स शाळेच्या कुंपणात, गोवा विधानसभेत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 08:50 PM2018-02-21T20:50:50+5:302018-02-21T20:51:04+5:30

ड्रग्स व्यवहाराच्या बाबतीत गोवा पोलीस गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत केला. विद्यार्थी या विषारी विळख्यात सापडत असल्याची चिंता विधानसभेत करण्यात आली. 

Drugs school fencing, concern in the Goa Legislative Assembly | ड्रग्स शाळेच्या कुंपणात, गोवा विधानसभेत चिंता

ड्रग्स शाळेच्या कुंपणात, गोवा विधानसभेत चिंता

Next

पणजी: ड्रग्स व्यवहाराच्या बाबतीत गोवा पोलीस गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत केला. विद्यार्थी या विषारी विळख्यात सापडत असल्याची चिंता विधानसभेत करण्यात आली. 
गोव्यात र्ड्ग्सचे व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती आमदार क्लाफासियो डायस, दिगंबर कामत, आन्तोनियो, विल्फ्रेड डिसा आणि इजिदोर फर्नांडीस यांनी संयुक्तरित्या विचारला होता. गृहमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सरकारचे नेतृत्व करणारे सुदिन ढवळीकर  यांनी या प्रश्नाला उत्तर देताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांची माहिती दिली. गोव्यात  चरस एमडीेमए, कोकेन, गांजा, हेरोईन, हशीश या सारखे अंमली पदार्थ मिळत असल्याची माहिती ढवळीकर यांनी यावेळी दिली. 
युवा पिडी ड्रग्सची शिकार होत असल्याचे फर्नांडीस यांनी यावेळी सभागृाच्या नजरेस आणून दिले. शैक्षणिक संस्थांत ड्रग्सचा वापर होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. आलेक्स रेजिनाल्ड व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काही उदाहरणे देऊन विद्यालयात कशा प्रकारे ड्रग्सचा वापर होत आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.  ड्रग्स न घेणाºया विद्याथ्यार्ला शाळेत वेडा म्हणतात अशी समजूतही पसरल्याचे रेजिनाल्ड यांनी यावेळी सांगिले. 
शैक्षणिक संस्थाना गृहखात्याकडून ड्रग्सच्या व्यवहारासंबंधी सतर्क राहण्यासंबंधी पत्रे पाठविण्यात आली असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली, यावर रवी नाईक यांनी आपल्या फोंडा येथील पीईएस विद्यालयात तसे पत्र पोहोचले नसल्याचे सांगितले.

Web Title: Drugs school fencing, concern in the Goa Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.