ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन, पर्यटन नकाशावर गोव्याची नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 06:38 PM2017-11-24T18:38:25+5:302017-11-24T18:38:40+5:30

एकेकाळी पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा फेसाळटे समुद्र आणि त्याचबरोबर फेसाळणारे बियरचे ग्लास अशी होती. मात्र आता ही ओळखही बदलू लागली आहे. सध्या गोवा पर्यटकांमध्ये ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन म्हणून परिचित होत आहे.

Drugs and Sex Destination, a new identity for Goa on the tourist map | ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन, पर्यटन नकाशावर गोव्याची नवी ओळख

ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन, पर्यटन नकाशावर गोव्याची नवी ओळख

googlenewsNext

सुशांत कुंकळयेकर
मडगाव : एकेकाळी पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा फेसाळटे समुद्र आणि त्याचबरोबर फेसाळणारे बियरचे ग्लास अशी होती. मात्र आता ही ओळखही बदलू लागली आहे. सध्या गोवा पर्यटकांमध्ये ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन म्हणून परिचित होत आहे. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम चालू असताना मागच्या तीन दिवसात तीन सेक्स रॅकेटस् पोलिसांनी उघडकीस आणल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 21 नोव्हेंबर रोजी हणजुण पोलिसांनी एक ऑनलाईन सेक्स रॅकेट उघडकीस आणताना चारजणांना अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी एका रशियन युवतीसह एकूण चार युवतींना मुक्त केले होते. त्याच्या दुस:याच दिवशी कळंगूट पोलिसांनी एका स्टार हॉटेलवर धाड घालून वेश्या व्यवसाय उघडकीस आणताना दोघांना अटक करीत एका युवतीला सोडविले होते. या घटना ताज्या असतानाच 23 नोव्हेंबर रोजी मडगावात एका ग्राहकाला पुरविण्यासाठी हणजुणहून दोन युवती आणल्या जात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत एका इसमाला करतानाच दिल्लीच्या दोन युवतींना मुक्त केले होते.

एकाबाजुने गोव्यात ड्रग्स केसीस वाढत असतानाच सेक्स रॅकेटस्ही उघडकीस येत असल्याने राज्यातील समतोल तर बिघडणार नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतार्पयत गोव्यात तब्बल 132 ड्रग्स विषयक प्रकरणो उघडकीस आली असून वेश्या विषयक 35 गुन्हे नोंद झाले आहेत. त्यातील पर्यटकांची गर्दी असलेल्या कळंगूट पोलीस स्थानकाच्या हद्दीत आतार्पयत अशाप्रकारची 9 रॅकेटस् उघडकीस आली आहेत.

पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणो गोव्यात येणा:या पर्यटकांना तरुणी पुरविण्यासाठी मुंबई, दिल्ली व बंगळुरु येथून गोव्यात मोठय़ा प्रमाणावर तरुणी आणल्या जातात, केवळ एका आठवडय़ासाठीच त्यांना येथे ठेवतात त्यानंतर मोबाईल किंवा ऑनलाईन माध्यमांतून ग्राहकांशी संपर्क साधून या तरुणी त्यांना पोचवितात. या एका आठवडय़ासाठी या तरुणींना दोन ते तीन लाख रुपयांची बिदागी देऊन गोव्यात आणले जाते. मात्र त्यांना गोव्यात आणणारा दलाल या एकाच आठवडय़ात स्वत:ची तीन चार लाखांची कमाई करुन मोकळा होतो. विशेषत: बांगला देशातील गरीब मुलींना या व्यवसायात बांधले जाते अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी मडगावात ज्या दोन तरुणींना मुक्त करण्यात आले त्याही 15 दिवसांपूर्वी दिल्लीहून गोव्यात आल्या होत्या. हणजुणो येथे एका हॉटेलात त्यांची रहाण्याची सोय केली होती. एक स्थानिक एजंट मोबाईलवरुन ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना या तरुणी पुरवित होता. गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीकडून मडगाव पोलिसांना मडगाव रेल्वे स्थानकावर एका ग्राहकाला पुरविण्यासाठी दोन तरुणींना आणले जात आहे याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात हा एजंट अलगद सापडला.
ओल्ड गोवा फेस्तातही एस्कोर्ट सव्र्हीस

गोव्यातील सेक्स ट्रेड व्यावसायिकांनी धार्मिक स्थळांनाही सोडलेले नाही. सध्या ओल्ड गोवा येथे सेंट फ्रान्सिस ङोवियरचे फेस्त चालू आहे. या ठिकाणीही एस्कोर्ट मुली पुरविण्यासाठी वेबसाईटवर लिंकस् दिल्या आहेत असा गौप्यस्फोट गोवा वुमन्स फोरम या संघटनेने केली आहे. एका वेबसाईटवर ही जाहिरात केली जात आहे असे या फोरमच्या लॉर्ना फर्नाडिस यांनी केली आहे. यासंबंधी पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.





 

Web Title: Drugs and Sex Destination, a new identity for Goa on the tourist map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा