गोवा पोलिसांकडे ड्रोन टिपणारी सिस्टम, सुरक्षेला वेगळे आयाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 08:59 PM2018-06-14T20:59:58+5:302018-06-14T21:01:25+5:30

अवकाशाततील बेकायदेशीर ड्रोनवर लक्ष्य ठेवण्यासाठी गोवा पोलिसांनी ड्रोन डिटेक्शन सिस्टम मिळवली असून, त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे.

Drone Teetner system to Goa police, different dimensions of security | गोवा पोलिसांकडे ड्रोन टिपणारी सिस्टम, सुरक्षेला वेगळे आयाम

गोवा पोलिसांकडे ड्रोन टिपणारी सिस्टम, सुरक्षेला वेगळे आयाम

googlenewsNext

पणजी: अवकाशाततील बेकायदेशीर ड्रोनवर लक्ष्य ठेवण्यासाठी गोवा पोलिसांनी ड्रोन डिटेक्शन सिस्टम मिळवली असून, त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. अशा प्रकारची ही यंत्रणा उपलब्ध असलेले गोवा पोलीस हे देशातील पहिलेच पोलीस खाते ठरले आहे.
स्टार्टअप योजनेअंतर्गत बंगळुरू येथील आयआयओ टेक्नोलोजी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

या उपकरणाच्या ५ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरापर्यंतच्या टापूत टेहळणी करण्याची क्षमता आहे. उडविले जाणारे अनधिकृत ड्रोन व इतर कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी ही माहिती दिली. विशेषत: दहशतवादी विरोधी पथकाला त्याचा उपयोग होणार आहे. ड्रोन हल्ल्यांच्या या युगात अनधिकृत ड्रोनवर लक्ष्य ठेवण्यासाठीच ते गोवा पोलिसांनी आणले आहे. या सिस्टमद्वारे केवळ ड्रोन टिपले जातात, असे नव्हे तर ड्रोन उडविणाऱ्यालाही टिपण्याची त्याची क्षमता आहे. या सिस्टीमची गोव्यात यशस्वी चाचणीही घेतली आहे.

वर्षभरापूर्वी लांब पल्ल्याची छायाचित्रे टिपण्याची क्षमता असलेले ड्रोन गोवा पोलिसांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते. गोव्यातील किना-यावर झालेल्या नववर्षारंभ पार्ट्या व खाण समर्थकांच्या आंदोलनात त्यांचा अत्यंत कुशलपणे वापर करण्यात आला होता. आता ड्रोन डिटेक्शन सिस्टमचा समावेश करण्यात आल्यामुळे सुरक्षेला वेगळे आयाम मिळाले आहेत.

Web Title: Drone Teetner system to Goa police, different dimensions of security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.