गोवा बनतोय मानवी तस्करीचे प्रमुख केंद्र, गेल्या पाच वर्षात अत्याचारात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 08:29 PM2018-12-28T20:29:35+5:302018-12-28T20:32:03+5:30

गोवा महिला व मुलीसाठी सुरक्षित राज्य असे सांगितले जात असले तरी या लहान राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचारही मोठय़ा प्रमाणावर असून मागच्या पाच वर्षात 1864 महिलांवर तर 1194 मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना पोलीस दफ्तरी नोंद झाल्या आहेत.

The creation of Goa, the main center of human trafficking, increased atrocities over the past five years | गोवा बनतोय मानवी तस्करीचे प्रमुख केंद्र, गेल्या पाच वर्षात अत्याचारात वाढ 

गोवा बनतोय मानवी तस्करीचे प्रमुख केंद्र, गेल्या पाच वर्षात अत्याचारात वाढ 

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: गोवा महिला व मुलीसाठी सुरक्षित राज्य असे सांगितले जात असले तरी या लहान राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचारही मोठय़ा प्रमाणावर असून मागच्या पाच वर्षात 1864 महिलांवर तर 1194 मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना पोलीस दफ्तरी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे ड्रग व्यवसायापाठोपाठ  गोव्यात महिलांची तस्करी हाही एक चिंतेचा विषय बनला आहे. 
गुरुवारी गोव्यात अशाप्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांची नोंद झाली असून पहिल्या घटनेत मडगावात एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांकडूनच बलात्कार होऊन ती गरोदर रहाण्याचा प्रकार उघडकीस आला असून दुस-या घटनेत अंजुणा पोलिसांनी वेश्या व्यवसायात सामील असलेल्या तिघांना अटक करताना दोन युवतींची सुटका केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये राजस्थानच्या एका पुरुष व्यक्तीबरोबर सांगलीच्या दोन महिलांचाही समावेश आहे.
वेश्या व्यवसायातील महिलांना त्या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेल्या अन्याय रहित जिंदगी (अर्ज) या संघटनेचे प्रमुख अरुण पांडे यांच्यामते, गोवा हे मानव तस्करीचे प्रमुख केंद्र बनले असून कित्येक महिला व मुलींना नोकरीचे आमिष देऊन गोव्यात आणले जाते आणि नंतर त्यांना वेश्या व्यवसायाला जुंपले जाते. फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी युवतींनाही अशाचप्रकारे फसवून गोव्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, वेश्या व्यवसायात आणलेल्या मुली बहुतेकवेळा नैऋत्य भारत, बंगाल, आंध्र व कर्नाटकातून आणल्या जातात. त्याशिवाय उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्केमिनिस्तान तसेच बांगला देशमधून या मुली आणल्या जातात. वास्तविक नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांना भारतात आणले जाते. मात्र भारतात आल्यावर या मुलींचे पासपोर्ट त्यांचे एजंट काढून घेतात आणि जर या मुलींनी वेश्या व्यवसायात जाण्यास नकार दिला तर भारतात बेकायदेशीर वास्तव केल्याच्या आरोपाखाली त्यांना पोलिसांकडे देण्याची धमकी दिली जाते.
पांडे यांच्या मताप्रमाणे, गोव्यात वास्तविक अशा घटना मोठय़ा प्रमाणावर घडत असतात. पण त्यातील काहीच प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. वास्तविक अशाप्रकारच्या मानवी तस्करीत असलेल्या संशयितांवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा असताना वेळकाढू न्याय प्रक्रियेमुळे त्या बाधित मुलींना योग्य न्याय मिळतच नाही. आजर्पयत अशाप्रकारच्या गुन्हय़ात संशयितांवर कडक कारवाई न झाल्यामुळे हे गुन्हे करण्यास हे संशयित भितही नाहीत असे ते म्हणाले.
अशा प्रकरणात बाधित तरुणींना योग्य न्याय मिळावा आणि ही प्रकरणो त्वरित हातावेगळी व्हावीत यासाठी गोव्यात दोन्ही जिल्हय़ांत खास न्यायालये स्थापन करावीत अशी मागणी अर्ज या संघटनेने केली आहे. येत्या आठवडय़ात या संदर्भात आम्ही गृहसचिवांची भेट घेऊ असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोव्यात अल्पवयीन मुलींवर होणा-या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातही बरीच वाढ झालेली असून नात्यातील व्यक्तींकडूनच अल्पवयीन मुलींवर बलात्कारासारखे अत्याचार होण्याचे प्रकार वाढले आहेत अशी खंत बायलांचो एकवोट या संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी व्यक्त केली. अशा प्रकरणावर अंकुश आणण्यासाठी गोव्यात एक खिडकी सहाय्यता केंद्र उघडण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: The creation of Goa, the main center of human trafficking, increased atrocities over the past five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.