जॉक सिक्वेरांचा पुतळा उभारण्याबाबत मतभिन्नता, मुख्यमंत्र्यांनी घोषणा टाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 07:01 PM2018-01-16T19:01:21+5:302018-01-16T19:17:03+5:30

जनमत कौल जिंकल्याने गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिले हे खरे असले तरी, जनमत कौल जिंकण्याच्या प्रक्रियेत अनेकांचे मोठे योगदान असल्याने स्वर्गीय जॉक  सिक्वेरा यांचा एकटय़ाचाच पुतळा विधानसभा किंवा सचिवालयासमोर उभा करण्याच्या फंदात सरकारने पडू नये, असे मत भाजपचे विविध आमदार व्यक्त करू लागले आहेत.

Controversy about setting up a statue of Jock sequence, the Chief Minister avoided the announcement | जॉक सिक्वेरांचा पुतळा उभारण्याबाबत मतभिन्नता, मुख्यमंत्र्यांनी घोषणा टाळली

जॉक सिक्वेरांचा पुतळा उभारण्याबाबत मतभिन्नता, मुख्यमंत्र्यांनी घोषणा टाळली

Next

 पणजी - जनमत कौल जिंकल्याने गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिले हे खरे असले तरी, जनमत कौल जिंकण्याच्या प्रक्रियेत अनेकांचे मोठे योगदान असल्याने स्वर्गीय जॉक  सिक्वेरा यांचा एकटय़ाचाच पुतळा विधानसभा किंवा सचिवालयासमोर उभा करण्याच्या फंदात सरकारने पडू नये, असे मत भाजपचे विविध आमदार व्यक्त करू लागले आहेत. भाजपमध्ये आमदार मायकल लोबो यांनी एकटय़ांनीच सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायलाच हवा, असा आग्रह धरला आहे पण सरकारमधील अन्य काही आमदार व मंत्री या मागणीशी सहमत नाहीत. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनाही याची कल्पना असून त्यांनी पुतळा उभारण्याची घोषणा करणो मंगळवारी टाळले.

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा विधानसभेसमोर उभा केला गेला, कारण ते मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते. जनमत कौल हा निवडणूक आयोगाने घेतला होता व त्यात विलीनीकरणवाद्यांचा पराभव व्हावा म्हणून अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह अनेक गोमंतकीयांचे योगदान होते. त्यामुळे विधानसभेसमोर केवळ जॉक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करण्याचा पायंडा पर्रिकर सरकारने पाडू नये असा विचार भाजपचे आमदार तसेच काही मंत्रीही व्यक्त करत आहेत. आमदार लोबो यांनी आपण विधानसभेत खासगी ठराव मांडणार पण तो आपला व्यक्तीगत ठराव असेल, ती भाजपची भूमिका नसेल, असा पवित्र घेतला आहे. सिक्वेरा यांचा पुतळा लोबो यांच्या कळंगुट मतदारसंघात आहे. मुख्यमंत्र्यांनी पुतळा उभा करण्याची मागणी मान्य करावी असा प्रयत्न लोबो व मंत्री विजय सरदेसाई हे करत आहेत. अजून त्याबाबत यश आलेले नाही. भविष्यात मागणी मान्य देखील होऊ शकते किंवा मागणी फेटाळूनही लावली जाऊ शकते पण तूर्त भाजपने व सरकारने पुतळा उभा करण्याचे अधिकृत आश्वासन कुणालाच द्यायचे नाही असे ठरविले असल्याची माहिती भाजपच्या आतिल गोटातून प्राप्त झाली. मुख्यमंत्री र्पीकर यांनी मडगावमधील कार्यक्रमाला यायलाच हवे, असा आग्रह लोबो यांनी धरला होता. मुख्यमंत्री तिथे पुतळ्य़ाची घोषणा करतील असे लोबो यांना व गोवा फॉरवर्डलाही अपेक्षित होते पण तसे घडले नाही. 

सिक्वेरा यांचा राजकीय प्रभाव हा ख्रिस्तीबहुल मतदारसंघांमध्ये होता. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा प्रभाव हा राज्यव्यापी होता. बांदोडकर हे भाजपच्या सगळ्य़ाच कार्यकत्र्यासाठी आयडॉल आहेत, सिक्वेरा यांची तुलना बांदोडकरांच्यासोबत करण्याच्या प्रथेला आम्ही चालना देऊया नको, अशी आपली भूमिका भाजपने काही आमदारांनाही समजावून सांगितली असल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली. 

पोस्टरना काळे फासले 

दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाने सर्वच मंत्री व आमदारांच्या मतदारसंघांमध्ये अस्मितायेचो जागर असे लिहिलेले पोस्टर्स लावल्याने काही मंत्री व आमदारांमध्ये त्याबाबतही चर्चा सुरू आहे. सर्वच मतदारसंघांत मंत्री सरदेसाई यांनी जॉक सिक्वेरांसोबत स्वत:चेही छायाचित्र असलेले पोस्टर्स लावल्याने अन्य पक्षीय मंत्री व आमदारांच्या भुवया आश्यर्चाने उंचावल्या गेल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर 

पणजी ते म्हापसा अशा मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेने असलेल्या सर्व पोस्टर्सना काळे फासण्याचा प्रकार कुणी तरी सोमवारी रात्री केला आहे. भाजपमध्ये त्याबाबतही चर्चा सुरू आहे. 

Web Title: Controversy about setting up a statue of Jock sequence, the Chief Minister avoided the announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा