अनंतकुमार हेगडेकडून राजघटनेचा अवमान - गोवा कॉंग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 10:33 PM2017-12-27T22:33:42+5:302017-12-27T22:34:05+5:30

केंद्रीय रोजगार आणि कौशैल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या निधर्मी शब्दाच्या बेजबाबदार व वादग्रस्त वक्तव्याचा गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यत्र शांताराम नाईक यांनी निषेध केला आहे. एकतर त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेऊन त्यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी  केली आहे.  त्यांनी भारतीय राजघटनेचा अवमान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Contempt of Rajghat by Anantkumar Hegde - Goa Congress | अनंतकुमार हेगडेकडून राजघटनेचा अवमान - गोवा कॉंग्रेस

अनंतकुमार हेगडेकडून राजघटनेचा अवमान - गोवा कॉंग्रेस

Next

पणजी: केंद्रीय रोजगार आणि कौशैल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या निधर्मी शब्दाच्या बेजबाबदार व वादग्रस्त वक्तव्याचा गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यत्र शांताराम नाईक यांनी निषेध केला आहे. एकतर त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेऊन त्यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी  केली आहे.  त्यांनी भारतीय राजघटनेचा अवमान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
नाईक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात अनंतकुमार यांचे वक्तव्य हे जितके बेजबाबदार आहे तितकेच घटना विरोधी असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकात ब्राह्मण युवा परिषदेत बोलताना अनंत हेगडे यांनी निधर्मी म्हणजे ज्यांना आपल्या रक्ताचे नाते ठाऊक नाही असे लोक असल्याचे म्हटले होते. जे स्वत:ला निधर्मी म्हणवून घेतात त्यांना आपल्या पालकांची ओळख मिळालेली नाही असेही त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यामुळे ते त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. 
मंत्रीपदाची शपथ घेताना हेगडे यांनी  भारतीय राजघटनेचा आदर राखण्याची ग्वाही दिली होती, परंतु आता ते  घटनेशीच द्रोह करीत आहेत. भाजपचे  आणखी एक नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निधर्मी हा शब्द बाबासाहेब आंबेडकर यांनी राजघटनेत सामाविष्ठ केलाच नव्हता असे खळबळजनक विधान केले आणि हा शब्द नंतर घटना दुरुस्ती आणून जोडला गेल्याचे म्हटले होते. घटनेत झालेल्या दुरुस्त्या या घटनेचा भाग ठरत नाही काय असा प्रश्न नाईक यांनी केला. हेगडे आणि स्वामी या दोघांनीही आपली वक्तव्ये मागे घ्यावीत आणि जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Contempt of Rajghat by Anantkumar Hegde - Goa Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा