ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 6 - युतीबाबत काँग्रेस पक्षाने खूप सावध भूमिका घेऊन स्थितीचा आढावा घेण्याचे काम चालविले आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी आज येथे सांगितले. येत्या 9 रोजी काँग्रेसच्या छाननी समितीची व 10 तारखेला काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. उमेदवारीसह युती व तत्सम विषयांबाबत त्यावेळी निर्णय होतील, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, की काँग्रेस पक्ष सत्तेसाठी हापापलेला नाही. आम्हाला युती करून केवळ नेतेच मिळवायचे नाहीत. आम्हाला लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. नेते आले व लोक मिळाले नाही तर काय होईल असा विचार काँग्रेस पक्ष करतो. त्यामुळेच योग्य प्रकारे युतीच्या प्रस्तावाबाबत विचारविनिमय पक्षात विविध स्तरावर सुरू आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनीही युती मागितली आहे. पक्षश्रेष्ठी त्याविषयी निर्णय घेतील.
गोवा फॉरवर्ड पक्षाविषयी बोलताना चोडणकर म्हणाले, की गोवा फॉरवर्डसोबत आमचा संघर्ष नाही. त्या पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले, प्रवक्ते प्रशांत नाईक वगैरे आमचे मित्र आहेत. मात्र गोवा फॉरवर्ड जे काही बोलतो ते त्या पक्षाने अगोदर स्वत: अंगिकारायला हवे. आम्हाला हायकमांड नको, असे गोवा फॉरवर्ड पक्ष दिवसभर बोलतो व दुस:याबाजूने युतीबाबत काँग्रेसच्या हायकमांडशीच तो पक्ष चर्चा करतो. अगोदर गोवा फॉरवर्डने काँग्रेसच्या स्थानिक श्रेष्ठींसोबत काय ती बोलणी करावीत. आम्ही अजुनही चाळीसही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहोत.
काँग्रेसच्या उमेदवारांबाबत बोलताना चोडणकर म्हणाले, की येत्या 10 तारखेला सायंकाळर्पयत उमेदवार जाहीर होतील. काँग्रेसचे उमेदवार केवळ एक कुणी नेता ठरवत नाही. निर्णय प्रक्रियेत अनेक माणसे समाविष्ट आहेत. गट समित्यांकडून नावे घेऊन ती जिल्हा समितीकडे पाठवली गेली व तिथून ती नावे पक्षाच्या प्रदेश निवडणूक समितीकडे गेली. नंतर छाननी समितीकडे पाठवली गेली. छाननी समितीची एक बैठक झाली आहे.
काही आयपीएस व आयएएस अधिकारी बदली झाल्यानंतर देखील अजुनही सेवेत ठेवले गेले आहेत. स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी याविरुद्ध तत्काळ पाऊले उचलावीत, अन्यथा आम्ही दिल्लीत निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असा इशारा चोडणकर यांनी दिला. या अधिका:यांना गोव्यातच ठेवून निवडणुकीवेळी काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध त्यांचा वापर करण्याची सरकारची योजना आहे. अशा प्रकारे मुक्त वातावरणात निवडणुका होऊ शकत नाहीत, असे चोडणकर म्हणाले.
राहुल गांधींची उत्तरेत सभा 
निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची उत्तर गोव्यात एक सभा होईल. मडगावमध्ये एक सभा यापूर्वी झाल्यानंतर उत्तरेतीलही काँग्रेसजनांनी उत्तर गोव्यास राहुलजींची सभा व्हावी अशी विनंती केली असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी 2क्12 साली भाजप नेत्यांनी अनेक देवस्थानांमध्ये जाऊन देवाकडे काँग्रेसच्या धोरणाविरुद्ध गा:हाणो घातले होते. भाजपने तेच धोरण कायम ठेवून देवांनाही फसवले अशी टीका चोडणकर यांनी केली.
(खास प्रतिनिधी)