गोव्यात भाजपावासी झालेल्या कॉंग्रेस आमदारांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:04 PM2018-12-17T13:04:39+5:302018-12-17T13:04:43+5:30

कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या दोन्ही नेते दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळून लावली. 

Congress MLAs got Relief in Goa | गोव्यात भाजपावासी झालेल्या कॉंग्रेस आमदारांना दिलासा

गोव्यात भाजपावासी झालेल्या कॉंग्रेस आमदारांना दिलासा

googlenewsNext

पणजी - कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या दोन्ही नेते दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळून लावली. कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा हा स्वत: होवून दिला नाही हे सिद्ध करणारे पुरावे सादर करण्याचा आदेश खंडपीठाने याचिकादाराला केली होती. तसे पुरावे सादर करण्यास याचिकादार मगो पक्षाला अपयश आले होते. मागील आठवड्यातच या याचिकेवरील सुनावणी संपली होती व खंडपीठाने निवाडा राखून ठेवला होता. 

मगो पक्षाकडून अपात्रता याचिका ही सभापतीकडे न सादर करता खंडपीठात सादर करण्यात आली होती.  त्यात दोघाही नेत्यांकडून देण्यात आलेले राजीनामे व सभापतीकडून ते स्वीकारण्याची पद्धत पूर्णपणे घटनाबाह्य होती असा दावा केला होता. अगोदर दोन्ही आमदार हे भाजपात गेले व नंतर त्यांचे राजीनामे स्वीकारले गेले असा दावा करून हे पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे मगो नवेते व याचिकादार सत्यावान पालकर व विकास प्रभू यांनी याचिकेत म्हटले होते. त्यांच्या वकिलाकडूनही केवळ याच मुद्यावर युक्तिवाद केले होते. अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी हे युक्तिवाद खोडून काढताना आमदारकीचे राजनामे स्विकारण्याची तारीख व वेळ तसेच भाजप प्रवेशाची वेळ व तारीख न्यायालयात विषद करून सांगितली होती. 

खंडपीठाकडून या प्रकरणात निवाडा राखून ठेवताना निवाड्याची तारीखही जाहीर केली नव्हती. सोमवारी हा निवाडा देतावा न्यायमूर्ती एस एम बोधे व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने अपात्रता याचिका फेटाळण्यात आल्याचे सांगितले.

Web Title: Congress MLAs got Relief in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.