काँग्रेस आमदाराला हवाय समुद्र किनाऱ्यावर कार्निवाल, गोवा विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 02:31 PM2018-02-20T14:31:58+5:302018-02-20T14:32:23+5:30

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर सरकारी कार्निवाल साजरा करावा अशी मागणी कॉंग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी गोवा विधानसभेत केली. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतील असा त्यांचा दावा आहे. 

Congress MLAs demanded in the Carnival, Goa Legislative Assembly on the sea coast | काँग्रेस आमदाराला हवाय समुद्र किनाऱ्यावर कार्निवाल, गोवा विधानसभेत मागणी

काँग्रेस आमदाराला हवाय समुद्र किनाऱ्यावर कार्निवाल, गोवा विधानसभेत मागणी

Next

पणजी- गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर सरकारी कार्निवाल साजरा करावा अशी मागणी कॉंग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी गोवा विधानसभेत केली. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतील असा त्यांचा दावा आहे. 
प्रश्नोत्तराच्या तासाला हा मुद्दा उपस्थित करताना आमदार सिल्वेरा यांनी राज्य सरकारकडून कार्निवाल केवळ मोजक्याच शहरात साजरा केला सात असल्याचे सांगून तो अधिक ठिकाणी करण्याची गरज व्यक्त केली. विशेष म्हणजे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर कार्निवल साजरा करावा. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने ते अधिक फायदेशीर ठरणार आहे असल्याचे त्यानी सांगितले. 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हा मुद्दा विचारात घेतला जाईल आणि त्यावर चर्ग्रेचा केली जाईल अशी सावध भुमिका घेतली.  तसेच कॉंग्रेस आमदारांकडून त्यासाठी सहकार्य करण्याची गरजही व्यक्त केली. मोरजीत कार्निवाल घडवून आणला परंतु काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे त्यासाठी उपस्थित राहिले नाहीत असे त्यांनी सांगितले. गोव्यात पणजी, म्हापसा, वास्को, मडगाव, फोंडा याठिकाणी सरकारी कार्नीवाल साजरा केला जातो. यावर्षी पेडणे तालुक्यातही करण्यात आला होता.
 

Web Title: Congress MLAs demanded in the Carnival, Goa Legislative Assembly on the sea coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.