Goa Election 2019 : गोव्यात लोकसभेसाठी आयोगाचे ८0 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दिष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:19 PM2019-04-19T12:19:35+5:302019-04-19T12:20:44+5:30

‘आपका व्होट, आपकी ताकद! २३ एप्रिल को आपकी ताकद जरुर दिखाना!ंं’, मतदानासाठी ही प्रोत्साहनपर प्रतिक्रिया दिली आहे गोव्यातील आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी!

Commission wants more than 80 percent voting in goa for Lok Sabha | Goa Election 2019 : गोव्यात लोकसभेसाठी आयोगाचे ८0 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दिष्ट!

Goa Election 2019 : गोव्यात लोकसभेसाठी आयोगाचे ८0 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दिष्ट!

Next

- किशोर कुबल

पणजी : ‘आपका व्होट, आपकी ताकद! २३ एप्रिल को आपकी ताकद जरुर दिखाना!ंं’, मतदानासाठी ही प्रोत्साहनपर प्रतिक्रिया दिली आहे गोव्यातील आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी!  गोव्यात लोकसभेच्या आगामी निवडणुकीत ८0 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे, असे उद्दिष्ट आयोगाने ठेवले आहे आणि त्यासाठी अधिकारी जोरदार कामालाही लागले आहेत. ‘लोकमत’ आणि आयोगाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या मतदार जागृती ‘कोट्स’ लेखन स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने कुणाल यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७६.८६ टक्के मतदान झाले होते. आगामी निवडणुकीत किती मतदानाचे उद्दिष्ट आयोगाने ठेवले आहे? 

उत्तर : दक्षिण आणि उत्तर दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मिळून ११ लाख ३५ हजार ८११ मतदार आहेत. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या ७५,८५८ नी जास्त आहे. जे मतदार हयात नाहीत किंवा दिलेल्या पत्त्यावर सापडत नाहीत अथवा स्थलांतर केलेले आहे किंवा अन्य देशांचे नागरिकत्त्व स्वीकारलेले आहे, अशा मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आलेली आहेत. त्यामुळे यादी निर्दोष आणि परिपूर्ण बनलेली आहे. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७६.८६ टक्के मतदान झाले होते. यावेळी ८0 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे हे उद्दिष्ट ठेवून आमची यंत्रणा कामाला लागली आहे. 

प्रश्न : मतदार जागृतीसाठी कोणकोणते उपक्रम आयोगाने हाती घेतले आहेत आणि त्यासाठी किती मनुष्यबळ राबत आहे?

उत्तर : वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, कलाकार असे ३६ आयकॉन राज्यभर मतदार जागृतीचे काम करीत आहेत. येत्या २३ रोजी लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सार्वत्रिक तसेच विधानसभेच्या तीन मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. अधिकाधिक लोकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, अशी आमची इच्छा आहे. केबल टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ, सिनेमागृहांमध्ये जागृती केली जात आहेच शिवाय सोशल मिडिया तसेच अन्य माध्यमातूनही जागृती केली जात आहे. गोवा डेअरीच्या दुधाच्या पाकिटांवर मतदानाचा हक्क बजावणे यासंबंधी आवाहन करणारा संदेश लाल शाईने प्रिंट करण्यात आला आहे. सुमारे १ हजार बसगाड्यांमध्ये मतदानाचे आवाहन करणारे मोठे स्टिकर्स ठळकपणे लावण्यात येतआहेत. फेरीबोटींमध्येही स्टिकर्स लावण्यात आले आहेत. बस स्थानकांवर मतदानाचे आवाहन करणाºया उद्घोषणाही केल्या जात आहेत. लोकांना मतदानाविषयी जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आम्ही करत आहोत. 

प्रश्न : २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबी मतदान केंद्राची संकल्पना राबविण्यात आली होती. अशा मतदान केंद्रावर सर्व अधिकारी महिलाच नियुक्त केल्या होत्या. आगामी निवडणुकीत तशी काही योजना आहे का? दिव्यांगांसाठी काय व्यवस्था केली आहे? 

उत्तर : राज्यभरात १६५२ मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदारसंघात एक मतदान केंद्र असे असेल की तेथे सर्व महिला अधिकारीच नियुक्त केल्या जातील. परंतु अशा केंद्राला यावेळी गुलाबी मतदान केंद्र असे नाव आम्ही दिलेले नाही. दिव्यांगांसाठी सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था असेल. १२५0 व्हील चेअर मागविण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगाना मतदानात अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घेऊ. पायाने अधू असलेल्या किंवा चालू न शकणाºया मतदारांसाठी आयोग वाहनांची व्यवस्था करणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वाहन तैनात असेल. बीएल्ओंनी अशा मतदारांच्या नावाची यादी तयार केली आहे. या शिवाय अंध मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर तसेच मतदार स्लिपवर ब्रेल लिपीची सोय केली आहे. 

 

प्रश्न : सीव्हिजिल अ‍ॅपव्दारे तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध केली होती त्याला किती प्रतिसाद मिळाला.? आचारसंहिता भंगाचे प्रकार रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? तक्रारी हाताळण्याच्या बाबतीत विलंब लावला जातो अशा तक्रारी होत आहेत त्याबद्दल काय सांगाल? 

उत्तर : सीव्हिजिल अ‍ॅपव्दारे आतापर्यंत ३२ तक्रारी आलेल्या आहेत आणि सर्व निकालात काढलेल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाची ४0 भरारी पथके कार्यरत आहेत. दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केल्यासंबंधीची काँग्रेसच्या तक्रारीवर निवाडा देण्यास विलंब लागला कारण सर्व बाबी तपासून पहाव्या लागल्या. कायदेशीर सल्लाही घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगानेही सर्व गोष्टींची खातरजमा केलेली आहे. राज्यपालांनी घटनेच्या चौकटीतच हा आदेश काढलेला आहे. 

प्रश्न : निवडणुकीत पैसा, मद्य याचा वापर रोखण्यासाठी कोणते उपाय केले आहेत. किती मनुष्यबळ या एकूण निवडणूक प्रक्रियेसाठी राबत आहे? 

उत्तर : एकूण निवडणूक प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस मिळून सुमारे १५ हजार कर्मचारी राबत आहेत. ‘मनी लाँडरिंग’च्या बाबतीत कडक धोरण अवलंबिण्यात आले आहे. मटका, अंमली पदार्थ व्यवहार तसेच बाजारातील घाऊक खरेदी तसेच आॅनलाइन व्यवहार यावर आयोगाची बारकाईने नजर आहे. निवडणूक खर्चाच्या बाबतीतही आम्ही लक्ष ठेवून आहोत. गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथके सजग आहेत. चेक नाक्यांवर कडेकोट तपासणी केली जात आहे. वाणिज्य कर खाते, अबकारी खात्याच्या अधिकाºयांचीही नजर आहे. 

प्रश्न : दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर काय व्यवस्था केली आहे? गुलाबी मतदान केंद्राची संकल्पना यावेळीही राबविणार आहात काय?

उत्तर : दिव्यांगांसाठी सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था असेल. १२५0 व्हील चेअर मागविण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगाना मतदानात अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घेऊ. पायाने अधू असलेल्या किंवा चालू न शकणाºया मतदारांसाठी आयोग वाहनांची व्यवस्था करणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वाहन तैनात असेल. बीएल्ओंनी अशा मतदारांच्या नावाची यादी तयार केली आहे. या शिवाय अंध मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर तसेच मतदार स्लिपवर ब्रेल लिपीची सोय केली आहे. प्रत्येक मतदारसंघात एक मतदान केंद्र असे असेल की तेथे सर्व महिला अधिकारीच नियुक्त केल्या जातील. यावेळी गुलाबी मतदान केंद्र असे नाव देण्यात आलेले नाही एवढेच!

प्रश्न : सीव्हिजिल अ‍ॅपव्दारे तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध केली होती त्याला किती प्रतिसाद मिळाला.? आचारसंहिता भंगाचे प्रकार रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? तक्रारी हाताळण्याच्या बाबतीत विलंब लावला जातो अशा तक्रारी होत आहेत त्याबद्दल काय सांगाल? 

उत्तर : सीव्हिजिल अ‍ॅपव्दारे आतापर्यंत ३२ तक्रारी आलेल्या आहेत आणि सर्व निकालात काढलेल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाची ४0 भरारी पथके कार्यरत आहेत. दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केल्यासंबंधीची काँग्रेसच्या तक्रारीवर निवाडा देण्यास विलंब लागला कारण सर्व बाबी तपासून पहाव्या लागल्या. कायदेशीर सल्लाही घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगानेही सर्व गोष्टींची खातरजमा केलेली आहे. राज्यपालांनी घटनेच्या चौकटीतच हा आदेश काढलेला आहे. 

Web Title: Commission wants more than 80 percent voting in goa for Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.