गोव्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:20 PM2019-04-01T16:20:54+5:302019-04-01T16:21:10+5:30

गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवार २ एप्रिलपासून  सुरु होत आहे. 

the Class X exam Starting from tomorrow in Goa | गोव्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

गोव्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

Next

पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवार २ एप्रिलपासून  सुरु होत आहे. 

९६२१ मुलगे आणि ९७२२ मुली मिळून १९,३४३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विशेष गरजा असलेले २८४ परीक्षार्थी आहेत. 
उद्या मंगळवार २ रोजी सकाळी ९.३0 ते दुपारी १२ या वेळेत प्रथम भाषा इंग्रजी, मराठी, ऊर्दू, ३ एप्रिल-सकाळी ९.३0 ते ११.३0 फ्लोरिकल्चर (सीडब्लूएसएन), ४ एप्रिल- सकाळी ९.३0 ते ११ सोशल सायन्स पेपर-१, ८ एप्रिल-सकाळी ९.३0 गणित (मॅथेमेटिक्स), ९ एप्रिल - सकाळी ९.३0 व्यावसायिकपूर्व विषय, १0 एप्रिल -सकाळी ९.३0  व्दितीय भाषा हिंदी, फ्रेंच, १२ एप्रिल- सकाळी ९.३0 सायन्स (विज्ञान), १३ एप्रिल- सकाळी ९.३0 तृतीय भाषा, १५ एप्रिल- सकाळी ९.३0 सोशल सायन्स पेपर २ अशी मुख्य परीक्षा होणार आहे.

२३ एप्रिल रोजी गोव्यात निवडणूक असल्याने या दिवशी ठेवलेला बेसिक कुकरी या व्यावसायिक विषयाची परीक्षा आता २५ रोजी एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षागृहात स्मार्ट घड्याळांना मनाई आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील कोणतीही वस्तू वापरता येणार नाही. मोबाइल फोन, कॅलक्युलेटर वापरण्यास बंदी आहे.

Web Title: the Class X exam Starting from tomorrow in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.