‘चिपी’ झाला, ‘मोपा’रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 07:49 PM2018-09-12T19:49:36+5:302018-09-12T19:50:02+5:30

गोव्यातील नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ मात्र अनेक कारणांमुळे रखडला आहे. दोन्ही विमानतळांची घोषणा एकाचवेळी झाली होती परंतु ‘मोपा’ या ना त्या कारणावरुन रखडला. 

'Chipi' happened, 'Mopa'! | ‘चिपी’ झाला, ‘मोपा’रखडला!

‘चिपी’ झाला, ‘मोपा’रखडला!

Next

पणजी : शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाने अखेर बाजी मारली. मात्र गोव्यातील नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ मात्र अनेक कारणांमुळे रखडला आहे. दोन्ही विमानतळांची घोषणा एकाचवेळी झाली होती परंतु ‘मोपा’ या ना त्या कारणावरुन रखडला. 


सुरवातीपासूनच चर्च संस्थेशी संबंधित व्यक्तींचा ‘मोपा’ला विरोध राहिलेला आहे. दक्षिण गोव्यातून तर या प्रकल्पाला वाढता विरोध आहे. मध्यंतरी पर्यावरणीय परिणाम अभ्यास अहवाल तसेच वृक्षतोडीच्या प्रश्नावरुन प्रकरण राष्ट्रीय हरित लवाद तसेच हायकोर्टाकडे गेले आणि काम रखडले परंतु ४ महिन्यांपूर्वी याबाबतीत काहिसा दिलासा मिळाला असून प्रत्यक्षात यापुढेच कामाला गती येणार आहे. 


राज्य हवाई वाहतूक विभागाचे संचालक सुरेश शानबोगे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘गेल्या वर्षी ४ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष काम सुरु झालेले असून ३६ महिन्यात म्हणजेच साधारणपणे डिसेंबर २0२0 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.’ हे काम वेळेत पूर्ण केले जाईल, असा दावा त्यांनी केला. 
दोन्ही विमानतळांचे नियोजन सर्वसाधारणपणे एकाच वेळी झाले होते. ‘मोपा’ मात्र मागे पडला. २२७१ एकर जमिनीत हा विमानतळ येणार आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणाम अभ्यास अहवालास दिलेले आव्हान राष्ट्रीय हरित लवादाने फेटाळल्यानंतर या प्रकल्पाला मोठा दिलासा मिळालेला आहे. जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी या विमानळाचे बांधकाम करीत आहे. 


आम आदमी पक्षाचा असा दावा आहे की, या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात ५४,६७६ झाडे कापावी लागणार आहेत आणि त्यासाठी वन खात्याचे अधिकारी कुलदीप शर्मा यांनी सह्याही केल्या आहेत. 


‘मोपा’च्या कामाला गती यावी यासाठी सरकारने गेल्या अधिवेशनात विधेयक संमत करुन खास पीडीए स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. या प्रकल्पासाठी आता पूर्वीप्रमाणे आजुबाजुच्या सहा ग्रामपंचायतींचे परवाने घ्यावे लागत होते ते घ्यावे लागणार नाहीत. प्राधिकरण आपल्या अधिकारात परवाने देईल. त्यामुळे कामाला गती येईल, असा दावा केला जात आहे. 


चिपीचा विमानतळ आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी बांधलेला. बुधवारी चतुर्थीच्या पूर्वसंध्येला १२ आसनी विमान प्रायोगिक तत्त्वावर या ‘चिपी’वर उतरविण्यात आले. चिपी येथील हा विमानतळ ‘मोपा’ पासून ६0 किलोमीटरच्या आतच आहे. 

Web Title: 'Chipi' happened, 'Mopa'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.