गोवा पोलीसांना बुलेटप्रूफ  जेकेट्सची ७ वर्षांपासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 9:31pm

गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट देण्यात येणार असल्याचे ७ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी गोव्यात तीन सरकारे पाहिली परंतु अद्याप बुलेटप्रूफ जॅकेट्सचा प्र्ताव एक इंचभरही पुढे सरकलेला नाही. 

पणजी:  गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट देण्यात येणार असल्याचे ७ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी गोव्यात तीन सरकारे पाहिली परंतु अद्याप बुलेटप्रूफ जॅकेट्सचा प्र्ताव एक इंचभरही पुढे सरकलेला नाही.  २६/११च्या मुंबईवरील दहश्तवादी हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारीही मारले गेल्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेट्सचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच मुद्यावर नंतर देशभरातील पोलीस खात्यांकडू बुलेटप्रूफ जॅकेट्सची मागणी करण्यात आली. गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट्स देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळी सरकारने केली. त्यासाठी पलीस खात्याकडून सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आले. हे प्रस्ताव गेली काही वर्षे गृहखात्यात पडून आहे.  प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर किरकोळ दुरुस्त्याही सुचविण्यात आल्या होत्या आणि फाईल पुन्हा पोलीस खात्याकडे पाठविण्यात आली होती. दुरुस्त्या करून पुन्हा गृहखात्याकडे पाठविण्यात आलेली फाईल अजून तशीच पडून आहे.  या विषयी विचारले असता पोलीस महासंचालक मुक्तेश् चंदर यांनी सांगितले की गोव्या सारख्या लहान राज्यासाठी ही समस्या सतावणे स्वाभाविक आहे. कारण कमी बुलेटप्रूफ जेकेट्सचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार पुढे येऊ पाहत नाहीत. कारण दर परवडत नाहीत असे त्यांनी सांगितले. 

संबंधित

जगभ्रमंतीवर निघालेल्या भारतीय नौदलाच्या ६ महिला अधिकाऱ्यांना करावा लागला वादळाचा सामना
गोवा शैक्षणिक हब बनतंय, उच्च शिक्षणाला पोषक वातावरण - मनोहर पर्रीकर
तरुण तेजपाल यांच्या खटल्यावरील सुनावणी फेब्रुवारीत सतत चार दिवस चालणार
गोव्याच्या किनारपट्टीतील शॅक्स वीज चोरीसाठी स्कॅनरखाली
कोळसा हाताळणीला दणका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 21 खाणींना 2 महिन्यांसाठी मान्यता

गोवा कडून आणखी

धातू पुनर्प्रक्रिया उद्योगांसाठी धोरण, परिषदेत केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन
गोव्यात उद्या टुरिस्ट टॅक्सींचा बंद; रेल्वे स्थानके, विमानतळावरुन कदंबची बससेवा  
गोव्यात न्यायदंडाधिकारी संशयाच्या घे-यात, एसीबीकडून चौकशी
गोव्यातील लोकोत्सवात नव्या रूपात कलाविष्कार
खाण घोटाळा प्रकरणात दिगंबर व डॉ. हेदेंविरोधात आरोपपत्र

आणखी वाचा