लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 08:14 PM2018-04-19T20:14:19+5:302018-04-19T20:14:19+5:30

- गोव्यात लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या कार्यकत्र्यामध्ये जोष निर्माण व्हावा म्हणून बुथस्तरीय कार्यकत्र्याचा मेळावा येत्या 13 रोजी आयोजित करण्यात आला असून त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कार्यकत्र्याना मार्गदर्शन करणार आहेत. बांबोळी- दोनापावल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात हा मेळावा होणार आहे.

BJP ready for Lok Sabha elections, Amit Shah in Goa on May 13 | लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात

लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात

Next

पणजी - गोव्यात लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या कार्यकत्र्यामध्ये जोष निर्माण व्हावा म्हणून बुथस्तरीय कार्यकत्र्याचा मेळावा येत्या 13 रोजी आयोजित करण्यात आला असून त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कार्यकत्र्याना मार्गदर्शन करणार आहेत. बांबोळी- दोनापावल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात हा मेळावा होणार आहे.

भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक गुरुवारी पणजीत पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आदींनी बैठकीतील चर्चा व निर्णयांविषयी माहिती दिली. लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला गोव्यातील दोन्ही जागा जिंकायच्या आहेत. कार्यकत्र्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी शहा हे सुमारे दहा हजार बुथस्तरीय कार्यकत्र्याना मार्गदर्शन करतील,असे तानावडे यांनी सांगितले. यावेळी प्रत्येक कार्यकर्ता, पक्षाचा आमदार, मंत्री, खासदार हे बुथस्तरीय मेळाव्यासाठी सभागृहात येताना दुचाकीवरून येतील. दुचाकीला भाजपचा ङोंडा लावलेला असेल, असे तानावडे यांनी नमूद केले. या मेळाव्याच्या तयारीसाठी आमदार व भाजप गटाध्यक्षांच्या सहभागाने पक्षाच्या बैठका सर्वत्र सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

र्पीकरांशी संवाद (चौकट)

मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे अमेरिकेत उपचार घेत असल्याने प्रथमच त्यांच्या अनुपस्थितीत भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. र्पीकर यांनी या बैठकीसाठी आपला संदेश पाठवला होता. र्पीकर यांनी आपल्याशी व अन्य पदाधिका:यांनी फोनवरून संपर्क साधल्याचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले. येत्या मे महिन्याच्या तिस:या आठवडय़ात आपण गोव्यात येईन, असे र्पीकर यांनी आपल्याला कळविल्याचे तेंडुलकर म्हणाले. र्पीकर यांच्या आरोग्याविषयी सोशल मिडियावरून विविध प्रकारच्या अफवा पसरविणो योग्य नव्हे असेही  ते म्हणाले.

माईणकरांकडे भाजयुमो 

दरम्यान, भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून पणजीतील 26 वर्षीय नगरसेवक प्रमेय माईणकर यांची नियुक्ती तेंडुलकर यांनी जाहीर केली. अगोदर शर्मद रायतुरकर हे भाजयुमोचे नेतृत्व करत होते. भाजयुमोच्या अध्यक्षपदी कुणीही वयाच्या चाळीशीर्पयतच राहू शकतो. रायतुरकर यांच्याकडे दक्षिण गोवा भाजपचे प्रवक्तेपद सोपविले गेले आहे. भाजपच्या किसान मोर्चा अध्यक्षपदी शंकर चोडणकर यांची नियुक्ती झाली आहे. भाजपचे उत्तर गोवा सचिव म्हणून समीर वळवईकर व अरुण नाईक यांची नियुक्ती झाली आहे.

Web Title: BJP ready for Lok Sabha elections, Amit Shah in Goa on May 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.