मिग-२९ लढाऊ विमानाला अपघात, दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर घडलेली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 6:16pm

बुधवारी दुपारी दाबोळी येथील भारतीय नौदलाचा विमानतळाच्या धावपट्टीवर नेहमीच्या सरावासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना भारतीय नोदलाचे मिग-२९ या लढाऊ विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे सदर जेट लढाऊ

वास्को : बुधवारी दुपारी दाबोळी येथील भारतीय नौदलाचा विमानतळाच्या धावपट्टीवर नेहमीच्या सरावासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना भारतीय नौदलाचे मिग-२९ या लढाऊ विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे सदर जेट लढाऊ विमान धांवपट्टीवरून बाहेर घसरून ते पेटले़ सुदैवाने प्रशिक्षित वैमानिकाने तांत्रिक आपत्कालिन यंत्रणेद्वार तो विमानातून बाहेर पडण्यात यश मिळविल्याने किरकोळ जखमांनी बचावला़ त्याच्यावर नौदलाच्या येथभल आय़एऩएस़एच़ जीवंती या हॉस्पिटलात उपचार चालू असून तो सुखरूप असल्याचे नौदल अधिकाºयांनी दिलेल्या माहितीवरून कळते़

या अपघाताबाबतीत वरिष्ठ जनसंपर्क नौदल अधिकारी कॅप्टन माथुर यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर अपघात दुपारी १२़३० च्या दरम्यान घडला़ त्यावेळी नौदलचे मिग - २९ हे लढाऊ विमान आपल्या नित्य सरावासाठी निघाले होते़ दाबोळी येथील आय़एऩएस़हंस या नौदलाच्या विमानतळाच्या पूर्व बाजुच्या धांवपट्टीवर उड्डाण करण्याच्या तयारीत असताना वैमानिकाला या विमानात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे दिसून येताच त्याने उड्डाण करण्याचा निर्णय बदलला़ त्यामुळे विमान धांवपट्टीवरून घसरून धांवपट्टीबाहेर गेले़ त्याचवेळी वैमानिकाने प्रसंगवधाने आपत्कालिन तांत्रिक यंत्रणेचा वापर करून विमानातून बाहेर पडण्यात यश मिळविले़ सुदैवाने या प्रयत्नात तो किरकोळ स्वरूपात जखमी होऊन बचावला़ विमान घसरत धांवपट्टीबाहेर आल्याने विमानाने लगेच पेट घेतला़ या जेट विमानाला अपघात झाल्याचे हवाई वाहतुक नियंत्रण केंद्रातील अधिकाºयांना दिसून येताच त्यांनी सर्व आपत्कालिन सेवा विभागाना माहिती देताच नौदलाचे आगीचे बंब व रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवित आग विझविली़ विमानातून बाहेर पडलेल्या वैमानिकाला तात्काळ रूग्णवाहिकेतून नौदलाच्या आय़एऩएस़एच़ जीवंती या हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल करण्यात आले़

सदर दुर्घटना विमानतळाच्या धांवपट्टीच्या पूर्व बाजुच्या टोकाला घडलेली असल्याने नेहमी या विमानतळावर सर्व प्रवासी विमाने याच बाजुने उतरतात़ ही दुर्घटना घडली त्यावेळी या विमानतळावर मोठ्या प्रमाणात विमाने उतरतात व उड्डाणही करतात़ या दुर्घटनेमुळे या धांवपट्टीची सुरक्षितता पडताळून पाहण्यासाठी तसेच अपघाताच्या चौकशीसाठी सदर धांवपट्टी सुमारे दोन तास नागरी हवाई विमानासाठी बंद ठेवण्यात आली़ त्यामुळे काही विमाने उशीराने उतरली व उड्डाण केले़ त्यामुळे गोव्यात दाबोळी विमानतळावरील प्रवासी बराच वेळ अडकून राहिले़ दोन तासांनंतर ही धांवपट्टी विमानासाठी खुली करण्यात आल्यानंतर हवाई वाहतूक सुरळीत सुरू झाली़

अशाच प्रकारे ५ डिसेंबर २००५ रोजी नौदलाचे सी-हॅरिअर हे लढाऊ विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना धांवपट्टीवरून घसरत विमानतळाची संरक्षक भिंत छेदून एका उघड्या मैदानात कोसळले होते़ ते विमानही त्यावेळी आगीत भस्मसात झाले होते़ आणि वैमानिक कमांडर एच़एस़ पन्नू याचा मृत्यू झाला होता़ त्यानंतर आणखी एक हॅलिकोप्टर आज झालेल्या अपघाताच्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले होते आणि त्यात तीन वैमानिकांचा मृत्यु झाला होता़

केंद्रिय संरक्षण मंत्रालयाने गेल्या काही वर्षामागे फ्र ांसकडून ९ मिग-२९ विमाने खरेदी केली होती़ भारतीय नौदलाची विमानवाहु युध्द नौका आय़एऩएस़ विक्रमादित्य या जहाजावर तैनात करण्यात आलेली आहे़ त्यापैकी तीन विमाने प्रशिक्षणासाठी आय़एऩएस़ हंस या नौदलाच्या हवाई तळावर ठेवण्यात आलेली असून आज अपघात झालेले त्यापैकी एक विमान आहे़  

संबंधित

गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार
माझ्यावरील उपचार 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील : फ्रान्सिस
पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
दुर्दैवी मरियमची अजूनही पडत नाही आई-वडिलांशी गाठ
गोव्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवा, मगोपची मागणी

गोवा कडून आणखी

गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार
माझ्यावरील उपचार 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील : फ्रान्सिस
पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
दुर्दैवी मरियमची अजूनही पडत नाही आई-वडिलांशी गाठ
गोव्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवा, मगोपची मागणी

आणखी वाचा