सनातन संस्थेला राजाश्रय देणारे मंत्री सुदिन ढवळीकरांना हाकला, गोव्यात आपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 02:10 PM2018-10-13T14:10:30+5:302018-10-13T14:13:03+5:30

महाराष्ट्रातील गोव्याचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांचा सनातन संस्थेला राजाश्रय असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

aap demands for expulsion of sudin dhawalikar from bjp party | सनातन संस्थेला राजाश्रय देणारे मंत्री सुदिन ढवळीकरांना हाकला, गोव्यात आपची मागणी

सनातन संस्थेला राजाश्रय देणारे मंत्री सुदिन ढवळीकरांना हाकला, गोव्यात आपची मागणी

Next

पणजी : महाराष्ट्रातील गोव्याचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांचा सनातन संस्थेला राजाश्रय असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ढवळीकर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही या पक्षातर्फे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी केली आहे. सनातनचे गोव्यात रामनाथी ( ता. फोंडा ) येथे आश्रम आहे. महाराष्ट्रातील बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने जरी मुक्त केलेले असले तरी ते स्फोट घडविण्यात आमचा सहभाग होताच, असे ‘इंडिया टुडे’च्या छुप्या कॅमेऱ्यावर सनातन संस्थेच्या दोघा साधकांनी सांगितले आहे.

गोव्यातील धडाडीचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील, गोव्याचे एटीएस सलीम शेख यांची विधाने कॅमे-याने नोंद केली आहेत. त्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस आम्ही करूनही त्याची दखल घेतली नसल्याचे म्हटले आहे. याविषयी भाजप, गोवा फॉरवर्ड पक्ष तसेच अपक्ष आमदार मौन बाळगून आहेत. पोलीस अधिका-यांनी उघड केलेल्या गोष्टीवर ते काहीही बोलत नाहीत. कारण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा असणारे ढवळीकर पर्रीकर सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

त्यांनी राष्ट्रीय चौकशी यंत्रणेने या प्रकरणी तपास करावा अशी मागणी केलेली आहे. महाराष्ट्रातील हे स्फोट २००८ मध्ये ठाणे, पनवेल व वाशी येथे थिएटर व इतर ठिकाणी घडविले होते. ‘इंडिया टुडे’ वाहिनीने सोमवारी (८ ऑक्टोबर) दाखविलेल्या एका वृत्तांतात सात वर्षांपूर्वी न्यायालाने सुटका केलेल्या मंगेश दिनकर निकमने आपणच ते बॉम्ब ठेवले होते, असे छुप्या कॅमे-यावर बोलताना दाखविले आहे. निकम (वय ४५) हा सनातनी साधक असल्याचे पोलिसांनी नोंदविले होते.

वाशीतील थिएटरमध्ये चालू असलेल्या एका नाटकात हिंदू देवतांची थट्टा केल्याच्या निषेधार्थ हे स्फोट घडविले होते. दुसरा एक साधक हरीभाऊ कृष्णा दिवेकरने (वय ५८) सांगितले की, २००८च्या स्फोटात त्याची जबाबदारी मोठी होती. त्याचीही पुराव्याअभावी सुटका झाली आहे. रायगड येथे छुप्या कॅमेºयासमोर त्याने सांगितले की त्याच्याजवळ स्फोटके होती; परंतु दहशतविरोधी पथकाने (एटीएस) तो तपशील आरोपत्रात नोंदविलाच नाही.

मडगाव बाँबस्फोटाच्या मुळाशी जाण्यात अपयश

आप’चे गोव्यातील समन्वयक एल्विस गोम्स म्हणतात की, पोलीस अधिकाºयांनी राजकीय दबावामुळे पुढील कृती करू शकत नसल्याचे उघड केले आहे. त्यामुळे सनातन संस्थेच्या रामनाथी येथे चालत असलेल्या संशयास्पद कारवायांची चौकशी होण्यात अडथळा निर्माण होत आहे. राजकीय नेत्यांमुळेच २00९ मध्ये मडगाव येथे बॉम्बस्फोटाच्यामुळापर्यंत जाण्यास गोवा पोलीस अपयशी ठरले.

लोकांच्या जीवाशी खेळ सरकारने लोकांच्या जीवाशी खेळू नये. सनातन संस्थेची न्याय्य चौकशी करण्यास कोणता राजकारणी अडथळा आणत आहे, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी आपचे उत्तर गोवा जिल्हा प्रमुख सुनील शिंगणापुरकर यांनी केली.

सनातन संस्थेच्या वकिलाचा इन्कार
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून सनातन संस्थेच्या वकिलाने संस्थेच्या सहभागाचा इन्कार केला आहे.

कोट

हिंदू धर्म आणि संस्कृतीचे जतन, रक्षण करणाºया सर्वांना माझा पूर्ण पाठिंबा होता आणि आताही आहे. सनातन संस्था हिंदू धर्मासाठी काम करते. त्यांनी कधीही देशविरोधी काम केलेले नाही. त्यामुळे त्यांना माझा कायमचा पाठिंबा राहीलच.

सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नेते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा

 

Web Title: aap demands for expulsion of sudin dhawalikar from bjp party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.