गोव्यात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ४३५६ कोटी रुपये, केंद्र सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 09:19 PM2018-03-15T21:19:55+5:302018-03-15T21:19:55+5:30

गोव्यात राष्ट्रीय महामार्गांसाठी ४३५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून विविध कामे चालू असल्याची अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या ७५.१२ किलोमिटर रस्त्याची २५ कामे चालू आहेत. 

4356 crores for the construction of National highways in Goa, Central Government information | गोव्यात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ४३५६ कोटी रुपये, केंद्र सरकारची माहिती

गोव्यात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ४३५६ कोटी रुपये, केंद्र सरकारची माहिती

Next

पणजी : गोव्यात राष्ट्रीय महामार्गांसाठी ४३५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून विविध कामे चालू असल्याची अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या ७५.१२ किलोमिटर रस्त्याची २५ कामे चालू आहेत. 

देशभरात एकूण ४ लाख ३२ हजार ५३८ कोटी रुपयांचे १४00 रस्ता प्रकल्प मंजूर झालेले असून या रस्त्यांची लांबी ४४,१0८ किलोमिटर आहे. केरळ व पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७१ रस्ता प्रकल्प असून १६४७ किलोमिटरच्या मार्गावर २१,0४२ कोटी रुपये खर्च केले जातील. या एकूण रस्ता प्रकल्पांपैकी ३४३ प्रकल्प या ना त्या कारणामुळे अडचणीत आहेत. डिसेंबर २0२0 पर्यंत या रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी प्रकल्प विकासक, राज्य सरकार तसेच कंत्राटदारांकडे वेळोवेळी बैठका घेतल्या जात आहेत. बांधकामांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयांमध्ये या बैठका घेतल्या जातात,असे स्पष्ट करण्यात आले. या रस्ता प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. भूसंपादन प्रक्रियेत तसेच पर्यावरणीय परवान्यांच्या बाबतीत सुसूत्रता आणली जात आहे. संबंधित मंत्रालयांशी समन्वय साधला जात आहे, असेही नमूद करण्यात आले. 

आंध्र प्रदेशमध्ये ४३३६ कोटींची, अरुणाचलप्रदेशमध्ये २५४ कोटींची, आसामात १५१0 कोटी, बिहारमध्ये ५१0६ कोटी, छत्तीसगढमध्ये १0२१ कोटी, गुजरातमध्ये १९0२ कोटी, हरयानात ८४0 कोटी, हिमाचलप्रदेशमध्ये १0३२ कोटी, जम्मू काश्मिरमध्ये १६१ कोटी, झारखंडमध्ये १५५५ कोटी, कर्नाटकात ४७४९ कोटी, केरळात १५0४ कोटी, मध्य प्रदेशमध्ये ७६७८ कोटी, महाराष्ट्रात २६,८४१ कोटी, मणिपूरमध्ये ८९८ कोटी, मेघालयात १८२ कोटी, मिझोराममध्ये ३७९ कोटी, नागालँडमध्ये ११९७ कोटी, ओडिशात २६४४ कोटी, पाँडिचरीत ५४ कोटी, पंजाबात १२९९ कोटी, राजस्थानमध्ये ३00७ कोटी तर सिक्किममध्ये ७२४ कोटी रुपये खर्चाची रस्ता बांधकामे चालू आहेत, असेही या माहितीत म्हटले आहे. 

Web Title: 4356 crores for the construction of National highways in Goa, Central Government information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा