आंदोलनामुळे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:41 PM2018-11-19T22:41:34+5:302018-11-19T22:41:51+5:30

सिरोंचाचे एसडीपीओ यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने तहसील कार्यालयासह महसूल विभागाच्या इतर कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले आहे.

Work jam due to agitation | आंदोलनामुळे कामकाज ठप्प

आंदोलनामुळे कामकाज ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देमहसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग : तहसील कार्यालयात शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचाचे एसडीपीओ यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील महसूल कर्मचाºयांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने तहसील कार्यालयासह महसूल विभागाच्या इतर कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले आहे.
कामबंद आंदोलन असल्याने कर्मचारी कार्यालयात सही करून बाहेर पडत आहेत. विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयामध्ये नागरिक येत आहेत. मात्र एकही कर्मचारी हजर नसल्याने आलेल्या नागरिकांना परत जावे लागत आहे. सकाळपासून नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी राहत असल्याने हे कार्यालय गजबजलले राहत होते. आता मात्र शुकशुकाट पसरला आहे. कामबंद आंदोलनावर कधी तोडगा निघेल, याची प्रतीक्षा सामान्य नागरिक करीत आहेत.

Web Title: Work jam due to agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.