महिलांचा दारूविक्रेत्यांना सज्जड दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:18 AM2019-06-16T00:18:24+5:302019-06-16T00:18:51+5:30

तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा इशारा महिलांनी दारूविक्रेत्यांना दिला.

The women will be ready for liquor shops | महिलांचा दारूविक्रेत्यांना सज्जड दम

महिलांचा दारूविक्रेत्यांना सज्जड दम

Next
ठळक मुद्देसूर्यडोंगरीतील अवैध दारूविक्री । बंद झालेली दारूविक्री आठ महिन्यानंतर पुन्हा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा इशारा महिलांनी दारूविक्रेत्यांना दिला.
आठ महिन्यापूर्वी इंजेवारी, पेठतुकूम, देलोडा बु., देऊळगाव आणि किटाळी येथील गावकऱ्यांनी मिळून बंद केलेली सूर्यडोंगरीची दारूविक्री खूप गाजली होती. या पाचही गावांनी मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून आपल्या गावात दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेत विक्री बंद केली. पण सूर्यडोंगरी गाव याला अपवाद होते. गावात मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर होता. त्यामुळे हे गाव बाकी गावांसाठी डोकेदुखी ठरले होते. परिणामी या पाचही गावांतील लोकांनी सूर्यडोंगरी येथील दारूविक्री बंद करण्यासाठी मोठी बैठक घेत आरमोरी पोलीस स्टेशनवर धडक दिली.
लोकांचा निर्धार पाहून उपविभागीय दंडाधिकारी विशाल मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी सूर्यडोंगरी गावात त्याच रात्री बैठक घेत विक्रेत्यांना दारूविक्री बंद करण्याविषयी अल्टिमेटम दिला होता. विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सूर्यडोंगरीची दारूविक्री थांबली. ही पाचही गावे दारूविक्रेत्यांवर नजर ठेवून होतीच. पण आठ महिन्यांनी येथील दारूविक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती किटाळीच्या महिलांना मिळाली. दारू गाळून त्याची बाहेर तस्करी केली जात असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महिलांनी गुरुवारी सूर्यडोंगरी गाव गाठत विक्रेत्यांना दम देत विक्री बंद करण्यास सांगितले.
आरमोरी पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली असून कारवाईची मागणी महिलांनी केली आहे. नव्याने पुन्हा दारूविक्री सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार किटाळी येथील महिलांनी व्यक्त केला. पोलीस कधी कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
परिसराच्या गावातील दारूडे सकाळ व सायंकाळच्या सुमारास सूर्यडोंगरी येथे दाखल व्हायचे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची गर्दी असायची.
घनदाट जंगलाचा आधार
सूर्यडोंगरी गावापासून देलोडापर्यंत घनदाट जंगल आहे. शिवाय हा जंगल सिर्सी गावापर्यंत पसरला आहे. लहान टेकड्या असल्याने घनदाट जंगलाचा आधार घेऊन अवैध दारूविक्रेते दारू गाळून त्याची विक्री करीत असत. काही दिवस या जंगलात बिबट्याचेही बस्तान होते. तरी सुद्धा दारूडे रात्री उशिरापर्यंत येथून फिरत असत.

Web Title: The women will be ready for liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.