दारूड्या पतीच्या त्रासाने महिलेने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 08:16 PM2018-05-21T20:16:15+5:302018-05-21T20:16:15+5:30

पतीला सरकारी नोकरी, चांगला पगार, मात्र त्याला जडलेल्या दारूच्या व्यसनामुळे संसार नासलेल्या पत्नीने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सिरोंचा येथे घडली. या घटनेने सदर दाम्पत्याची दोन चिमुकली मुले मातृछत्रापासून कायमची मुकली आहेत.

Women Suicide News | दारूड्या पतीच्या त्रासाने महिलेने संपविले जीवन

दारूड्या पतीच्या त्रासाने महिलेने संपविले जीवन

Next

 गडचिरोली - पतीला सरकारी नोकरी, चांगला पगार, मात्र त्याला जडलेल्या दारूच्या व्यसनामुळे संसार नासलेल्या पत्नीने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सिरोंचा येथे घडली. या घटनेने सदर दाम्पत्याची दोन चिमुकली मुले मातृछत्रापासून कायमची मुकली आहेत.

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सहज मिळणाºया दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. सिरोंचा येथील शिल्पा वसंत कुमारे (२४) या महिलेचाही संसार असाच पतीच्या दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाला. तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असणारे वसंत कुमरे यांना दारूचे व्यसन जडले. या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचा बराच पगार दारूमध्ये जात होता. पतीने या व्यसनापासून दूर राहावे म्हणून शिल्पाने अनेक प्रयत्न केले, पण सुधारण्याऐवजी त्यांच्यात भांडणे व्हायला लागली. यामुळे शिल्पाने रंगविलेले सुखी संसाराचे स्वप्न धुळीस मिळाले. यातून रविवारी (दि.२०) रात्रीच्या १० च्या सुमारास नैराश्येतून शिल्पाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

पती वसंत कुमरे यांनी स्वत: पोलीस ठाणे गाठून पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

मृत शिल्पाला एक चार वर्षाची मुलगी आणि दिड वर्ष वयाचा मुलगा असे दोन अपत्य आहेत. आईचे छत्र हरपल्याने त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सोमवारी शवपरीक्षण केल्यानंतर शिल्पाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यात वाद व्हायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक टेकाम करीत आहे.

Web Title: Women Suicide News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.