चंदनवेली, कळमगाव, मिचगाव येथे होणार पाणी पुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:00 PM2018-06-18T23:00:16+5:302018-06-18T23:00:27+5:30

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत धानोरा तालुक्यातील मिचगाव, चामोर्शी तालुक्यातील कळमगाव व एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथे नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Water Supply Scheme to be done at Chandanwalei, Kalamgaon, Michgaon | चंदनवेली, कळमगाव, मिचगाव येथे होणार पाणी पुरवठा योजना

चंदनवेली, कळमगाव, मिचगाव येथे होणार पाणी पुरवठा योजना

Next
ठळक मुद्देपाणी समस्या सुटेल : प्रशासकीय मंजुरी प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत धानोरा तालुक्यातील मिचगाव, चामोर्शी तालुक्यातील कळमगाव व एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथे नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
चामोर्शी तालुक्यातील कळमगाव येथे ४० लिटर दरडोई दरदिवशी पाणी क्षमतेची नळ पाणी पुरवठा योजना निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी ५५ लाख ६२ हजार रूपयांचा अंदाजपत्राकास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. धानोरा तालुक्यातील मिचगाव येथे ६१ लाख ८१ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजना उभारली जाणार आहे. तर एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली या गावात ६६ लाख ३६ हजार रूपयांची योजना बांधली जाणार आहे.
या योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे. योजना बांधल्यानंतर किमान तीन वर्ष योजना चालविणे कंत्राटदारास बंधनकारक राहणार आहेत. योजनेत समाविष्ट किमान ८० टक्के नळ जोडणीधारकांकडून स्वखर्चाने मिटर जोडणी घेणेबाबत तसेच योजनेच्या देखभाल दुरूस्तीकरिता आवश्यक पाणीपट्टी भरण्याकरिता हमीपत्र प्राप्त झाल्याशिवाय योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊ नयेत, असे शासन निर्णयात म्हटले आहे. या तिन्ही गावात उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आले.

Web Title: Water Supply Scheme to be done at Chandanwalei, Kalamgaon, Michgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.