नुकसानग्रस्तांना मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:49 PM2017-12-10T23:49:01+5:302017-12-10T23:49:33+5:30

गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानपीक ऐन गर्भात असताना मावा, तुडतुडा, खोडकीडा व लष्कर अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते.

The victims will get help | नुकसानग्रस्तांना मदत मिळणार

नुकसानग्रस्तांना मदत मिळणार

Next
ठळक मुद्देधान उत्पादकांना दिलासा : आमदारांची महसूल मंत्र्यांशी चर्चा

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानपीक ऐन गर्भात असताना मावा, तुडतुडा, खोडकीडा व लष्कर अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली. या संदर्भात त्यांनी निवेदनही दिले होते. यावर महसूलमंत्र्यांनी मावा, तुडतुडा व इतर रोगाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
परतीच्या पावसाने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. रोगानेही शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू आणले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रोग व कीड याचा लाभासाठी उल्लेख नसल्याने शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या संदर्भात महसूलमंत्री पाटील यांनी रोगाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही यायोजनेचा लाभ देण्यात येईल, असे त्यांना सांगितले. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व विम्याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रश्नासाठी आमदार गजबे यांनी महसूलमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांचीही अनेकदा भेट घेऊन त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यापूर्वी त्यांनी शेतजमिनीची पाहणी केली होती.

Web Title: The victims will get help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.