अपघातात ट्रकने बसला चिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:34 AM2019-02-11T00:34:47+5:302019-02-11T00:35:19+5:30

सिरोंचावरून आलापल्लीकडे येणाऱ्या ट्रकने विरूध्द दिशेने जाणाºया बसला धडक दिली. यामध्ये बसचा बराचसा भाग चिरल्या गेला. सुदैवाने या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर घटना जिमलगट्टापासून सहा किमी अंतरावर येर्रागडा फाट्यावर घडली.

The truck sat in the crash | अपघातात ट्रकने बसला चिरले

अपघातात ट्रकने बसला चिरले

googlenewsNext
ठळक मुद्देयेर्रागडा फाट्याजवळची घटना : एक प्रवासी जखमी, ट्रक चालकाने केले होते अतिमद्यप्राशन

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : सिरोंचावरून आलापल्लीकडे येणाऱ्या ट्रकने विरूध्द दिशेने जाणाºया बसला धडक दिली. यामध्ये बसचा बराचसा भाग चिरल्या गेला. सुदैवाने या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर घटना जिमलगट्टापासून सहा किमी अंतरावर येर्रागडा फाट्यावर घडली.
एमएच ०६५-८८६८ क्रमांकाची अहेरी-सिरोंचा ही शेवटची आठ प्रवासी घेऊन सिरोंचाकडे जात होती. दरम्यान एमएच ३४ बीजी ९९१८ क्रमांकाचा ट्रक माल भरून तेलंगणा राज्यातून आलापल्लीकडे येत होता. येर्रागड्डा फाट्यावर ट्रक व बस यांची धडक झाली. यामध्ये बसच्या मागील चाकापासून मागचा भाग पूर्णपणे कापल्या गेला. बसमधील प्रवासी समोरच्या सिटवर बसले होते. त्यामुळे सात प्रवासी अतिशय किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्याबरोबर खासगी वाहनाने ते निघून गेले. केवळ बकय्या सलपाला (५०) रा. तेलंगणा राज्य हा जखमी झाला आहे. जिमलगट्टा येथील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला दवाखाण्यात भरती केले.
विशेष म्हणजे, वाहनचालक सचिन पोदाडी हा मोठ्या प्रमाणात दारू पिऊन असल्याचे दिसून येत होते. दारूच्या नशेतच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रकने बसला धडक दिली. धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. या अपघातात ट्रक व बसचेही मोठे नुकसान झाले. बस अन्वर कुरेशी हा चालक चालवित होता. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

Web Title: The truck sat in the crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात