समिती ठरविणार आदिवासी अध्यासन केंद्राचा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:26 PM2018-12-17T22:26:47+5:302018-12-17T22:27:06+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठातर्फे गोंडवाना आदिवासी अध्यासन केंद्र निर्माण करण्यात आले असून या केंद्रांतर्गत विद्यापीठस्तरावर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिठीची पहिली बैठक २१ डिसेंबर रोजी शुक्रवारला प्र-कुलगुरू यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

Tribal Education Centers course will be decided by the committee | समिती ठरविणार आदिवासी अध्यासन केंद्राचा अभ्यासक्रम

समिती ठरविणार आदिवासी अध्यासन केंद्राचा अभ्यासक्रम

Next
ठळक मुद्दे२१ ला पहिली बैठक : कला, साहित्य व गोंडी भाषेचा अभ्यास होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठातर्फे गोंडवाना आदिवासी अध्यासन केंद्र निर्माण करण्यात आले असून या केंद्रांतर्गत विद्यापीठस्तरावर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिठीची पहिली बैठक २१ डिसेंबर रोजी शुक्रवारला प्र-कुलगुरू यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेची द्वितीय सभा १५ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडली. यासभेमध्ये अधिसभा सदस्यांनी गोंडवाना आदिवासी अध्यासन केंद्रांतर्गत आदिवासी कला साहित्य गोंडी भाषेचा अभ्यास करण्याबाबत सुचित केले. या संदर्भाचा ठराव प्रा. रमेश हलामी यांनी अधिसभेत मांडला. त्यानुसार हा ठराव पारित करण्यात आला. आता गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी कला, साहित्य, गोंडीभाषा आणि तत्सम बाबीचा सर्वंकष अभ्यास करून या संदर्भाचा प्रस्ताव तयार करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सदर समितीची सभा २१ डिसेंबर रोजी विद्यापीठात होणार आहे. ही समिती अध्यासन केंद्राच्या अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टींचा समावेश राहणार हे ठरविले.
या समितीचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सी. व्ही. भुसारी आहेत. सदस्यांमध्ये अहेरीच्या राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. रमेश हलामी, डीआरडीएचे माजी प्रकल्प संचालक प्रभू राजगडकर, जनता महाविद्यालय चंद्रपूरचे प्रा. डॉ. योगेश्वर दुधपचारे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर आदींचा समावेश असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी सांगितले.

Web Title: Tribal Education Centers course will be decided by the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.