बोदली घाटातून रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:12 PM2019-07-16T23:12:35+5:302019-07-16T23:13:00+5:30

गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या बोदली रेतीघाटातून रेती तस्करांनी हजारो ब्रास रेतीची चोरी केली. याबाबतचे वृत्त लोकमतने ९ जुलै रोजी छायाचित्रासह प्रकाशित केले होते. याची दखल घेत गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी रेती तस्करी करणारा एक ट्रॅक्टर १५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता जप्त केला आहे.

Trawler trawler seized from Bodhi Ghat | बोदली घाटातून रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

बोदली घाटातून रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’ने वेधले होते लक्ष : घाटाचे मोजमाप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या बोदली रेतीघाटातून रेती तस्करांनी हजारो ब्रास रेतीची चोरी केली. याबाबतचे वृत्त लोकमतने ९ जुलै रोजी छायाचित्रासह प्रकाशित केले होते. याची दखल घेत गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी रेती तस्करी करणारा एक ट्रॅक्टर १५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता जप्त केला आहे.
यावर्षी रेतीचे लिलाव होण्यास विलंब झाला. याचा डाव साधत १० पेक्षा अधिक रेती तस्करांनी या घाटातून हजारो ब्रास रेतीची चोरी केली आहे. रेतीघाटाचा लिलाव झाल्यानंतर जेवढी रेती उपसल्या गेली नसती, त्यापेक्षा अधिक रेतीचा उपसा या घाटातून करण्यात आला. विशेष म्हणजे सदर रेतीघाट गडचिरोली शहरापासून अवघ्या आठ किमी अंतरावर असतानाही महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यावर्षी या रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. इतर रेतीघाटातून रेती सुरू झाल्यानंतर खुलेआम रेतीची तस्करी केली जात होती. या रेती तस्करांमुळे ज्या ठेकेदारांनी पैसे भरून रेतीघाटांचे लिलाव घेतले होते, सदर रेतीघाट मालक अडणीत आले होते. त्यांची रेती विकल्या जात नव्हती.
९ जुलैच्या अंकात लोकमतने रेतीघाटातून सुरू असलेल्या रेती तस्करीचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे रेती तस्करांमध्ये खळबळ माजली होती. काही दिवस रेतीची चोरी बंद ठेवली होती. काही दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा रेतीची तस्करी सुरू झाली. तहसीलचे अधिकारी व कर्मचारी कोणतीही कारवाई करीत नसल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांना पुढाकार घ्यावा लागला. १५ जुलै रोजी एमएच-३३-एफ-५०३१ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता, या वाहनात चोरलेली रेती आढळून आली. सदर ट्रॅक्टर चालकाकडे टीपी नव्हती. सदर ट्रॅक्टर लांझेडा येथील गुरूदेव सहारे यांच्या मालकीचा आहे. सदर ट्रॅक्टरवर तहसीलदारांनी १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तहसीलच्या अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे
यावर्षी रेतीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. सुमारे चार ते पाच हजार रुपये ट्रिपने रेती विकली जात होती. याचा पुरेपूर गैरफायदा रेती तस्करांनी घेतला. विशेष म्हणजे सदर रेतीघाट गडचिरोली शहरापासून अगदी आठ किमी अंतरावर आहे. मुख्य मार्गानेच ट्रॅक्टर आणावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असताना मागील सहा महिन्यांपासूून तहसीलच्या अधिकाºयांनी एकही ट्रॅक्टर जप्त केला नाही. यावरून रेती तस्करांनी तहसीलच्या अधिकाºयांसोबत संधान साधले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तहसीलच्या अधिकारी व कर्मचाºयांनी कोणतीही कारवाई केली नाही. उपविभागीय अधिकाºयांना पुढाकार घ्यावा लागला.
बोदली रेतीघाटातून हजारो ब्रास रेती चोरण्यात आली आहे. यामध्ये शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमकी किती रेतीची चोरी झाली याचे मोजमापसुद्धा प्रशासनाने केले नाही.

Web Title: Trawler trawler seized from Bodhi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.