ट्रेलरमुळे वाहतुकीची कोंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:36 AM2019-05-08T00:36:02+5:302019-05-08T00:45:00+5:30

शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बसस्थानक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरचे अतिक्रमण हटविले नसल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

The trailer caused traffic congestion | ट्रेलरमुळे वाहतुकीची कोंडी वाढली

ट्रेलरमुळे वाहतुकीची कोंडी वाढली

Next
ठळक मुद्देरस्त्यावरील अतिक्रमण हटवा : एकतर्फी वाहतुकीने समस्या; उन्हाचे चटके करावे लागतात सहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बसस्थानक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरचे अतिक्रमण हटविले नसल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच मोठमोठे ट्रेलर मार्गावरून जात असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.
शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात एसटी, दुचाकी वाहने व मालवाहू वाहनांची गर्दी राहते. एका बाजूचे खोदकाम केले असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. दोन्ही बाजुची वाहने एकाच मार्गाने जात असल्याने सर्वप्रथम या मार्गाच्या बाजूचे अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. मात्र नगर परिषद तसेच बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविले नाही. अजूनही दुकाने रस्त्यावरच आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दोन मोठी वाहने समोर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. नगर परिषदेने पुढाकार घेऊन अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. महामार्गाचे बांधकाम जवळपास एक वर्ष चालणार आहे. तेवढे दिवस शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावरचे अतिक्रमण हटविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास छत्तीसगडकडे जाणाऱ्या ट्रेलरने धानोरा मार्गावर वाहतुकीची कोंडी केली. जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प होती. भर उन्हात जवळपास अर्धा तास वाहनधारकांना थांबावे लागल्याने वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.

Web Title: The trailer caused traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी