देसाईगंज येथे तीन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:36 PM2019-06-14T22:36:31+5:302019-06-14T22:36:50+5:30

देसाईगंज पोलिसांनी शुक्रवारी दोन ठिकाणी सापळा रचून सुमारे ३ लाख ६ हजार रुपयांची दारू व दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुनी येथून मारोती सुझूकी या चारचाकी वाहनाने देसाईगंजात दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली.

Three lakh liquor seized at DesaiGanj | देसाईगंज येथे तीन लाखांची दारू जप्त

देसाईगंज येथे तीन लाखांची दारू जप्त

Next
ठळक मुद्देदोन कारवाया : वाहनेही ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी शुक्रवारी दोन ठिकाणी सापळा रचून सुमारे ३ लाख ६ हजार रुपयांची दारू व दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुनी येथून मारोती सुझूकी या चारचाकी वाहनाने देसाईगंजात दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे, सहायक फौजदार मोहनदास सयाम, पोलीस हवालदार मनोहर गोटा, पोलीस शिपाई भावेश वरगंटीवार, चालक शंकर गडे यांनी रेल्वे लाईनच्या मागील बाजूस गांधी वार्डात सापळा रचला. अर्जुनीवरून येणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता, वाहनात ४५ बॉक्स देशी दारू आढळून आली. त्याची किंमत २ लाख ७० हजार रुपये होते. या प्रकरणी दिलीप आशन्ना कुसनकार, अनिल निमजे दोघेही आंबेडकर वार्ड देसाईगंज, विक्की रा. अर्जुनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी दुपारी समीर बडोले हा दुचाकीने दारू आणत होता. पोलीस शिपाई कृष्णा जुवारे, प्रकाश चिकराम यांनी त्याच्याकडून सहा बॉक्स दारू जप्त केली. त्याची किंमत ३६ हजार रुपये होते व वाहनाची किंमत ४५ हजार रुपये आहे. दारू व दुचाकी वाहन असा एकूण ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Three lakh liquor seized at DesaiGanj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.