संभाजी ब्रिगेडचे काम वेगाने पुढे न्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:28 AM2018-05-28T01:28:52+5:302018-05-28T01:28:52+5:30

विद्यमान सरकार हे देशात विषमतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत सदर विषमतावादी व्यवस्था मोडून काढण्यासाठी आता संभाजी ब्रिगेड तयार झाली आहे.

Take the work of Sambhaji Brigade fast | संभाजी ब्रिगेडचे काम वेगाने पुढे न्या

संभाजी ब्रिगेडचे काम वेगाने पुढे न्या

Next
ठळक मुद्देसौरभ खेडेकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन : जिल्हास्तरीय अधिवेशनात राजकीय स्थितीवर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यमान सरकार हे देशात विषमतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत सदर विषमतावादी व्यवस्था मोडून काढण्यासाठी आता संभाजी ब्रिगेड तयार झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे काम वेगाने पुढे सुरू ठेवावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अधिवेशन स्थानिक गोकुलनगरातील शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विनोद थेरे होते. स्वागताध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरिक्षक चंद्रकांत वैद्य, प्रवक्ते शिवानंद भानुसे, प्राचार्य घनशाम दिवटे, लोकमान बरडे, वक्ते दिलीप चौधरी, जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, जगदिश पिलारे, प्रविण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सौरभ खेडेकर म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण सरकारने कमी केल्यामुळे येथे मोठा अन्याय झाला आहे. आदिवासी व गैरआदिवासींमध्ये अंतर पाडून त्यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, अशी टिका खेडेकर यांनी केली. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडने न्यायाची भूमिका घेऊन राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्टÑ विधानसभेतील १०० मतदार संघ पूर्ण ताकदीनिशी लढू, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शाम भर्रे, संचालन तालुकाध्यक्ष विकास तुमडे तर आभार मारोती दुधबावरे यांनी केले.
कार्यक्रमाला विनायक बांदूरकर, पांडुरंग नागापुरे, प्रा. शेषराव येलेकर, मोरेश्वर उईके, पंकज कोहळे, प्रभाकर पोटे, श्रावण दुधबावरे, प्रभाकर गव्हारे, प्रकाश पिंपळकर, दादाजी चुधरी, राजेश गोहणे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Take the work of Sambhaji Brigade fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.