सिरोंचाच्या एसडीपीओंवर शिस्तभंगाची कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:28 AM2018-11-15T01:28:27+5:302018-11-15T01:28:51+5:30

महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

Take disciplinary action against the Sironcha SDPs | सिरोंचाच्या एसडीपीओंवर शिस्तभंगाची कारवाई करा

सिरोंचाच्या एसडीपीओंवर शिस्तभंगाची कारवाई करा

Next
ठळक मुद्देकामबंद आंदोलनाचा इशारा : महसूल कर्मचारी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, डी. एम. दहिकर, एस. एस. बारसागडे, किशोर मडावी, झेमानंद मेश्राम, विकास कुमरे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, १ नोव्हेंबर रोजी महसूल विभागाच्या वतीने रात्री १२ वाजतापासून कारवाई करीत तेलंगणा राज्यातून मेडीगड्डा प्रकल्पासाठी अवैध गोणखनिजाची वाहतूक करताना १० ट्रक जप्त करण्यात आले. त्यानंतर सदर ट्रक सिरोंचाच्या पोलीस ठाण्यात पहाटे ४ वाजता देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २ नोव्हेंबरला सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास सिरोंचाच्या तहसील कार्यालयात दोन अज्ञात व्यक्ती व पोलीस पथकासह आले. यावेळी सिरोंचाचे तहसीलदार शासकीय दौऱ्यावर होते. यावेळी तिथे गौणखनिज जप्त प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी उपस्थित असलेल्या तलाठी रवी मेश्राम व गजभिये यांना एसडीपीओंनी अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे संघटनेचे अध्यक्ष चंदू प्रधान यांनी सांगितले. याबाबतची लेखी तक्रार संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे केली. त्यामुळे आपण संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत आहोत, असे प्रधान यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर शिवीगाळ प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने १४ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला सिरोंचा येथील महसूल कर्मचारी काळ्या फिती आंदोलन करणार आहे, अशी माहिती प्रधान यांनी यावेळी दिली.
प्रसंगी अभियोग दाखल करणार
सिरोंचा येथे झालेल्या या सारख्या असंवैधानिक बाबी यापुढे घडू नये, कोणत्याही शासकीय कर्मचाºयांच्या भावनेला ठेच पोहाचू नये व प्रशासनातील कारभार सुरळीत पार पडावा, अशी आमची भूमिका असून महसूल कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अन्यथा अभियोग दाखल करणार, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांनी यावेळी दिला.

Web Title: Take disciplinary action against the Sironcha SDPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस