वीज बचतीसाठी खबरदारी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:20 AM2019-04-10T00:20:16+5:302019-04-10T00:21:04+5:30

उन्हाचा कडाका वाढला असून सर्वत्र कुलर्स, पंखे, एसी आदी थंडावा देणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या आपल्या अनेक कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढल्याने विजेचे बिलही वाढत आहे.

Take caution to save electricity | वीज बचतीसाठी खबरदारी घ्या

वीज बचतीसाठी खबरदारी घ्या

Next
ठळक मुद्देमहावितरण कंपनीचे आवाहन : कमी वीज वापरा, बिल कमी भरा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उन्हाचा कडाका वाढला असून सर्वत्र कुलर्स, पंखे, एसी आदी थंडावा देणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या आपल्या अनेक कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढल्याने विजेचे बिलही वाढत आहे. वीज वापर कमी करून बिल नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
वीजेच्या उपकरणाचे जेवढे वॅटेज कमी व तासात वापर कमी तेवढी कमी विजेची खपत होणार. पंखे व कुलर्स यांचा वापर उन्हाळ्यात जास्त असतो. त्यामुळे वीजबिल जास्त येते. परंतु यांच्या वापरातही व्यवस्थित वापराने विजेची खपत कमी होऊ शकते. कुलर्स (डेझर्ट) एकदम उन्हात न ठेवता सावलीत असले म्हणजे कमी पाणी व पयार्याने कमी वेळात जास्त जागा थंड करून कुलर्सचा वापर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वीजबिलही साहजिकच कमी येणार. पंखे जर स्लॅबच्या घरात स्लॅबच्या वर बांधकाम नसेल तर ते स्लॅब उघडे पडून जास्त तापणार व पंखाही गरम हवा फेकणार. परंतु अशा ओपन स्लॅबवर जर ग्रिन नेट लावली तर स्लॅब जास्त गरम होणार नाही व पंखाही गरम हवा फेकणार नाही. ज्यांना एसीचा वापर परवडतो असे लोक आता एसीही वापरू लागले आहेत. साहजिकच त्यांचे विजेचे बिल मोठे असते. एसी १ टन साधारणत: १००० ते १५०० वॅटचे असते. त्यामुळे यांचा वापर एका तासात किंबहूना ४५ मिनीटातच एक युनिट पडतो. त्यामुळे दिवसाला १० ते १५ युनिट एका दिवसात एक एसी घेतो. परंतु यातही सेव्ह मोडवर ठेवल्यास व रूम नीट हवाबंद असेल व रूमचे छत सूर्यप्रकाशात उघडे नसेल तर रूम लवकर थंड होणार व वीज कमी लागणार. तसेच एसीचे आऊटडोअर युनिट सावलीत ठेवावे. फ्रिज गरम हवा फेकत असेल तर ते नीटपणे कुलिंग करण्यास भिंतीपासून एक फूट अंतरावर ठेवावे. विजेची उपकरणे त्याचा वॅट व दैनंदिन वापर जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अ‍ॅप आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपले महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीज बिलाची अंदाजीत रक्कम याची माहिती प्रप्त होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या वीज बिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये १ ते १००, १०० ते ३०० व ३०० ते ५०० व ५०० ते १००० युनिट संदर्भातील दर दर्शविले असतात. त्याचा संदर्भ घेवून वीजवापराचे गणित सोडवता येते.

यंत्र वापरताना अशी घ्यावी खबरदारी
पंखे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर्स लावून कमी स्पीडवर ठेवल्यासही वीज वाचते. कुलर्सचे वॅटेज कुलर्सचा पंखा व पाणी फेकणारी मोटार असे एकंदरीत ४०० ते ५०० वॅटच्या आसपास असते. त्यामुळे दोन किंवा तीन तासातच मोठे डेझर्ट कुलर्ससुध्दा एक युनिट जाळतात. टीव्ही स्टँडबाय मोडवर ठेवू नये. फ्रिज व एसीच्या कॉईल साफ करणे, फ्रिजमध्ये एलईडी बल्बचा वापर करावा. त्यामुळे वीजवापरात बचत होते.

Web Title: Take caution to save electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.