पीक विमा योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:21 AM2018-06-17T01:21:55+5:302018-06-17T01:21:55+5:30

शासनाने २४ मे २०१८ च्या शासन निर्णयान्वये, खरीप हंगाम २०१८ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Take advantage of the Crop Insurance Scheme | पीक विमा योजनेचा लाभ घ्या

पीक विमा योजनेचा लाभ घ्या

Next
ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : कर्जदारांसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाने २४ मे २०१८ च्या शासन निर्णयान्वये, खरीप हंगाम २०१८ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१८ अशी असून बिगर कर्जदार शेतकरी २४ जुलै २०१८ पर्यंत या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे.
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना सदरची योजना बंधनकारक आहे. अशा शेतकºयांना कर्ज मंजूर कालावधी १ एप्रिल ते ३१ जुलै २०१८ आहे. अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून मागील वर्षी खरीप हंगाम २०१७ पासून गावपातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे.
शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यास्तव प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०१८ व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी २४ जुलै या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Take advantage of the Crop Insurance Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.