ठळक मुद्देदुसºया दिवशीही आंदोलन सुरूच : मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम भागातील शिक्षकांच्या त्वरीत बदल्या करून नवीन शाळेवर रूजू करून घ्यावे या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षक संघटनेतर्फे १३ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. दुसºया दिवशीही मंगळवारी उपोषण सुरूच असून या उपोषण आंदोलनाला इतरही शिक्षक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.
जिल्ह्यातील पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी आपला पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना आणखी पाठबळ मिळाले आहे. शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्याचा ऐतिहासीक निर्णय शासनाने घेतला. दुर्गम भागातील शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र प्रस्तापित संघटना न्यायालयात गेले. १० टक्के दुर्गम भागातील नागरिक शिक्षकांसाठी ९० टक्के सर्वसाधारण भागातील शिक्षकांवर अन्याय करीत आहे, असा भास निर्माण करण्यात आला. मात्र हे चुकीेचे आहे. न्यायालयाने शासनाच्या बाजुने निर्णय देऊन बदली प्रक्रिया योग्य असल्याचे निर्देश दिले. आंदोलनाला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख चंदू रामटेके, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव बापू मुनघाटे, अध्यक्ष गुरूदेव नवघडे, शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष नत्थुजी पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राजेश दरेकर, सरचिटणीस विजय भोगेकर यांनी भेट देऊन आंदोलना पाठींबा दर्शविला.