विद्यार्थ्यांनी जाणली शस्त्रांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:42 AM2019-01-06T00:42:14+5:302019-01-06T00:42:56+5:30

पोलीस दलाचा स्थापना दिन पोटेगाव येथे रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. तसेच नक्षल्यांविरोधात महिला हुंकार रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

Students know the weapon information | विद्यार्थ्यांनी जाणली शस्त्रांची माहिती

विद्यार्थ्यांनी जाणली शस्त्रांची माहिती

Next
ठळक मुद्देपोटेगावात रेझिंग डे : नक्षल्यांविरोधात काढली हुंकार रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस दलाचा स्थापना दिन पोटेगाव येथे रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. तसेच नक्षल्यांविरोधात महिला हुंकार रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने २ जानेवारीला पोलीस मदत केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पोलिसांकडील हत्यारे, दारूगोळा व इतर साधनसामुग्रीची माहिती जाणून घेतली. पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश चिकणे यांनी एस. एल. आर., ए. के. - ४७, एल. एम. जी. , यू. बी. जी. एल., ९ एम. एम. पिस्टल, २ इंच मोटार, भारतीय बनावटीची इन्सास रायफल, डीएसएमडी (बॉम्ब शोधक यंत्र) आदी शस्त्रांची माहिती दिली.
३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मदत केंद्र व शासकीय आश्रमशाळेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमानंतर भामरागड तालुक्यातील आदिवासी युवती बेबी मडावी हिची नक्षल्यांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ महिला हुंकार रॅली काढण्यात आली. सदर रॅली शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून काढून गावातील मुख्य मार्गाने फिरविण्यात आली. याप्रसंगी पं. स. सदस्य मालता मडावी, प्रभारी अधिकारी उमेश चिकणे, सरपंच ओंकारेश्वर सडमाके, पीएसआय श्रीकांत डांगे, किशोर मुनरतीवार, प्रतिभा मोहुर्ले, पीएसआय शिवराज कदम, मुख्याध्यापक ए. डब्ल्यू. बोरकर, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, पी. बी. भोयर यांच्यासह नागरिक हजर होते.

Web Title: Students know the weapon information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.