दारूविक्रीच्या तक्रारी बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:16 PM2019-01-22T23:16:18+5:302019-01-22T23:16:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात कायदेशीर दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने दारू विक्री होत आहे. ही दारूविक्री बंद होण्यासाठी ...

Strengthen alcohol sales complaints | दारूविक्रीच्या तक्रारी बळकट करा

दारूविक्रीच्या तक्रारी बळकट करा

Next
ठळक मुद्देमुक्तिपथतर्फे व्यसनमुक्तीवर आढावा बैठक : पोलीस अधीक्षकांचे अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कायदेशीर दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने दारू विक्री होत आहे. ही दारूविक्री बंद होण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून मुक्तिपथचे यासाठी सहकार्य मिळत आहे. सातत्याने धाडी टाकून मुक्तिपथ संघटन व पोलिसांद्वारे दारूसाठे नष्ट केले जात आहे. पण दारूविक्रेते मोकाट राहत असल्याने त्यांच्यावर कलम ९३, तडीपार आणि एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करून यांतर्गत कठोर शिक्षा होण्यासाठी दारू विक्रेत्यांवरील तक्रारी आणखी बळकट करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
सोमवारी सर्व तालुक्यातील मुक्तिपथ चमू व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. सर्वप्रथम पोलीस अधीक्षकांनी मुक्तिपथ तालुका चमूकडून तालुक्यातील दारूविक्री होत असलेल्या गावांचा, विक्रेत्यांचा, दारूची तस्करी होत असलेल्या मार्गांचा आढावा घेतला. यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, ठाणेदार यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक ठाण्यांतर्गत काही ठराविक गावांमध्ये दारूचा महापूर आहे. याचा त्रास आसपासच्या गावांना होतो. त्यामुळे अशा गावांमध्ये सातत्याने धाडी घाला, गावसंघटनेद्वारे कारवाई करून दारूसाठा पकडल्यास तत्काळ जाऊन मोका पंचनामा करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आगामी कारवाईसाठी उद्दीष्ट आराखडा तयार करा. गाव संघटनेचे कार्यकर्ते व महिलांना सोबत घेऊन गावागावात कारवाई करा, अशा सूचनाही अधीक्षकांनी दिल्या. बैठकीला मुक्तिपथ संचालक मयूर गुप्ता व तालुका संघटक हजर होते.
सीमावर्ती भागातील दारू तस्करीवर अंकुश ठेवा
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एटापल्ली आणि भामरागड हे तालुके छत्तीसगड या राज्याला तर अहेरी आणि सिरोंचा हे तालुके तेलंगणा व छत्तीसगड या दोन्ही राज्याला लागून आहेत. या दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू जिल्ह्यात येते. त्याचप्रकारे देसाईगंज व कुरखेडा हे तालुके भंडारा व गोंदिया जिल्ह्याला लागून आहेत. गोंदिया मार्गे बोडधा-केसुरी-महागाव, अजुर्नी वडसा तर भंडारा मार्गे लाखांदूर वडसा या मार्गे देशी-विदेशी दारू आणि सुगंधित तंबाखू देसाईगंज तालुक्यात आणि पर्यायाने जिल्ह्यात येतो. तेलंगणातून प्राणहिता नदीमार्गे गुडेम, मोदुमतुरा, वांगेपल्ली घाट मार्गे तर छत्तीसगड वरून कांकेर, एटापल्ली, चीचगोंडी, रामपूरचेकमार्गे अहेरी तालुक्यात, तेलंगणा वरून कालेश्वर मार्गे तर छत्तीसगड वरून पात्तागुडाम, कोट्टापल्ली, नडीकुडा, गुमलकोडा मागे सिरोंचा तालुक्यात, केशोरी, वाडेगाव आणि राजोरी मार्गे कुरखेडा तालुक्यात, छत्तीसगड मार्गे बोटेकसा काकोरी तर गोंदिया येथून मशेरी मार्गे कोरची तालुक्यात, शेवारी कसनसूर मार्गे एटापल्ली तालुक्यात दारूची तस्करी होते. त्यामुळे या सर्व सीमावर्ती भागातील दारू व तंबाखू तस्करीवर सरप्राईज चेकपोस्ट द्वारे अंकुश ठेवा, अशा सूचना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कारवाई प्रस्तावांचा अ‍ॅक्शन प्लान तयार करा
प्रत्येक तालुक्यातील दारू विक्रेत्यांची मोठी यादी पोलिसांकडे आहे. त्यांच्यावर कलम ९३, तडीपार आणि एमपीडीए अंतर्गत तक्रारी दाखल करून आचार संहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त विक्रेत्यांवर कारवाईचे उद्दिष्ट ठेवा. यासाठी कोर्टात तक्रार भक्कम करण्यासाठी कागदपत्रांची योग्यप्रकारे पूर्तता करा. बाहेरून येणारी दारू पकडल्यास तिथे जाऊन मुख्य विक्रेत्यास सहआरोपी करा, असे आदेशही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस सहकाºयांना दिले.

Web Title: Strengthen alcohol sales complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.