कुंपणासाठी वृक्षतोड थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:55 AM2018-06-25T00:55:51+5:302018-06-25T00:56:55+5:30

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पºहे तसेच आवत्या पीक जोमात आले आहे. तूर व अन्य पिकेही उगवण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी मोकाट व रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतकरी जंगलातील झाडे तोडून कुंपण करतात. यामुळे पर्यावरणाची हानी होते.

Stop the tree fencing | कुंपणासाठी वृक्षतोड थांबवा

कुंपणासाठी वृक्षतोड थांबवा

Next
ठळक मुद्देवन विभागाचे आवाहन : बांधावर पर्यायी वृक्षांची लागवड करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पºहे तसेच आवत्या पीक जोमात आले आहे. तूर व अन्य पिकेही उगवण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी मोकाट व रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतकरी जंगलातील झाडे तोडून कुंपण करतात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. याला पर्याय म्हणून झाडांची लागवड करावी, असे आवाहन आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी डी. बी. बारसागडे यांनी केले आहे.
झाडे तोडून कुंपण करण्यापेक्षा कुंपणाच्या ठिकाणी एकदा वृक्षाची लागवड केली आणि वर्षाच्या अंतराने निगा राखली तर त्यांची वाढ योग्य प्रकारे होईल. कटाई करणे, वनवा न लागू देणे याबाबतही खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम व पैशाची बचत होईल. शिवाय पिकांची नासाडी होणार नाही. पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांना मिळेल.
त्यामुळे शेतकऱ्यांनी वन विभागाचा सल्ला अंमलात आणावा, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी डी. बी. बारसागडे यांनी केले आहे.
वैरागड येथील गौण वनोपज केंद्रात क्षेत्र सहायक ए. एम. मेश्राम, वनरक्षक श्रीकांत सेलोट व शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.
वनौषधीचीही लागवड
शेती कुंपणासाठी करवंद, विलायती बाभूळ, सागरगोटी, चिल्लार, सिकेकाई, पारकेनसीनिया, हिंगनबेट, इंग्रजी चिंच, मेहंदी, घायपात आदी वनस्पतींची लागवड केल्यास वनशेती बरोबरच वनोपज म्हणून फायद्याचे ठरू शकते. यातील काही वनवृक्षांचा वनौषधी म्हणून उपयोग होतो. सोबतच वनाचेही संरक्षण होते.

Web Title: Stop the tree fencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.