चव्हेलावासीयांच्या पुनर्वसनाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:27 PM2018-12-08T22:27:01+5:302018-12-08T22:30:38+5:30

कोसरी लघुसिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या चव्हेला गावाचे कोसरी-मांगदा मार्गावर पाच एकर शेतीत पुनर्वसन केले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर बांधून दिले जात आहे.

The speed of rehabilitation of the chelavalas | चव्हेलावासीयांच्या पुनर्वसनाला गती

चव्हेलावासीयांच्या पुनर्वसनाला गती

Next
ठळक मुद्देघरांचे बांधकाम सुरू : ७७५ हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

डी. के. मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : कोसरी लघुसिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या चव्हेला गावाचे कोसरी-मांगदा मार्गावर पाच एकर शेतीत पुनर्वसन केले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर बांधून दिले जात आहे. त्याचबरोबर गावाच्या परिसरात शाळा, अंगणवाडी, रस्ते, पाणी, विजेची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
१९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासून एकही सिंचन प्रकल्प होऊ शकला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री डॉ. सुनील देशमुख व आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे तत्कालीन आमदार आनंदराव गेडाम यांच्या पाठपुराव्यामुळे आरमोरी तालुक्यातील कोसरी व कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा या दोन लघुसिंचन प्रकल्पांना शासनाने मंजुरी दिली होती. कोसरी लघुसिंचन प्रकल्पाच्या कामाला २०११ मध्ये सुरू झाली. २०१५ मध्ये ९५ टक्के काम पूर्ण झाले. मात्र या सिंचन प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या चव्हेलावासीयांनी आमचे पुनर्वसन केल्याशिवाय गाव न सोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे पुढील कामे ठप्प पडली. बांधावर पाणी सोडण्याचे गेट बसविण्यात आले आहे. मात्र कालव्याची कामे प्रलंबित पडली आहेत.
चव्हेलावासीयांनी जमीन व घराच्या मोबदल्याकरिता न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायालयाने चव्हेलावासीयांच्या बाजुने निर्णय देत त्यांच्या शेत जमिनीला योग्य किंमत व घर बांधून देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शासनाने मांगदा मार्गावर पाच एकर शेती खरेदी केली आहे. या ठिकाणी १२३ घरे बांधण्यासाठी ले-आऊट टाकण्यात आले आहेत. शाळा, अंगणवाडी व इतर सार्वजनिक सुविधांचेही बांधकाम सुरू आहे. रस्ते, पाणी, वीज सुविधा सुध्दा उपलब्ध करून दिली जात आहे. एखाद्या शहराप्रमाणे कॉलनी उभी राहत आहे. चव्हेलावासीय घराचे बांधकाम करण्यात गुंतले आहेत. कोसरी सिंचन प्रकल्पामुळे ७७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

Web Title: The speed of rehabilitation of the chelavalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.