बंदुकीने केली चितळाची शिकार, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:24 AM2019-03-02T01:24:38+5:302019-03-02T01:26:37+5:30

एटापल्लीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या गेदा गावातील युवकांनी भरमार बंदुकीने चितळाची शिकार केली. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना अटक केली. अहेरी न्यायालयाने शुक्रवारी तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविले.

A shotgun victim shot dead, three arrested | बंदुकीने केली चितळाची शिकार, तिघांना अटक

बंदुकीने केली चितळाची शिकार, तिघांना अटक

Next
ठळक मुद्दे१४ दिवसांचा एमसीआर : गेदा गावातील युवकांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्लीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या गेदा गावातील युवकांनी भरमार बंदुकीने चितळाची शिकार केली. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना अटक केली. अहेरी न्यायालयाने शुक्रवारी तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविले.
दि. २५ ते २७ फेब्रुवारी असे तीन दिवस गेदा गावात मोठा उत्सव ठेवुन नवीन हनुमान मंदिरात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२५ पासून एक चितळ मंदिर परीसरात व गावात फिरत होते. मूर्तीची स्थापना झाल्याने सव्वा महिना मांस-मटन न खाण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे त्या चितळाची शिकार करण्यास गावकऱ्यांचा विरोध होता. परंतु दि.२८ ला मंदिर परीसरात फिरत असलेल्या चितळाला गावातील मुलाजी उलके मट्टामी (२८) या युवकाने भरमार बंदुकीने गोळी झाडून ठार केले. ही माहिती गावकºयांनी वनविभागाला दिली. एटापल्लीचे वनपरिश्रेत्र अधिकारी संजूदास राठोड, वनपाल दुर्गेश तोगरवार, वनरक्षक पाटील यांनी गावात जावुन आरोपीच्या घरातून शिकार केलेल्या चितळाला ताब्यात घेतले. याशिवाय या कामात मदत करणाºया बाबुराव राजू पुंगाटी (३२) आणि ईश्वर राजू पुंगाटी (२९) या दोन भावांनाही अटक केली.
वनविभागाने पंचनामा करून आणि पशुधन विकास अधिकारी डॉ.उमेश सोनटक्के यांनी शवपरिक्षण केल्यानंतर चितळाला सायंकाळी ७ वाजता गावकºयांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. याप्रकरणी तीनही आरोपींना शुक्रवारी अहेरी न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Web Title: A shotgun victim shot dead, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.