शोभायात्रेने चामोर्शी नगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:10 AM2018-03-19T00:10:14+5:302018-03-19T00:10:14+5:30

श्री संप्रदाय भक्त सेवा समिती गडचिरोली तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने गुढीपाडवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमुळे चामोर्शी नगरी दुमदुमली.

Shobhayatre with Charmshi Nagari Dummundi | शोभायात्रेने चामोर्शी नगरी दुमदुमली

शोभायात्रेने चामोर्शी नगरी दुमदुमली

Next
ठळक मुद्देगुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम : श्री संप्रदाय भक्त सेवा समितीचा पुढाकार

ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : श्री संप्रदाय भक्त सेवा समिती गडचिरोली तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने गुढीपाडवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमुळे चामोर्शी नगरी दुमदुमली.
शोभायात्रा काढण्यापूर्वी सकाळी ९ वाजता आॅनलाईन महासत्संग कार्यक्रम घेण्यात आला. १२ वाजता सांस्कृतिक भवन बाजार चौकातून मुख्य बाजारपेठ मार्गे वाळवंटी चौक, मार्र्कंड मोहला, माता मंदिर, राम मंदिर, चवडेश्वरी मंदिर, लक्ष्मी गेट, बसस्थानक, जोशी पेट्रोलपंप, हनुमान नगर मार्गे शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत कलशधारी महिला व गुढीधारी महिला रथावर विराजमान झालेली झाकी काढण्यात आली. महिलांची कलश यात्राही निघाली. त्याचबरोबर आदिवासी नृत्य, खांद्यावर केशरी ध्वज घेतलेले महिला व पुरूष ‘गुरूमाऊली नरेंद्रस्वामी जय जय योगीया’ असा गजर करीत होते.
शोभायात्रेत आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, जिल्हा अध्यक्ष किशोर कुथे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाबाराव तरासे, जिल्हा कमांडर सुरेश चिचघरे, तालुका अध्यक्ष रमेश बारसागडे, कविता चिळंगे, भारती तरासे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आनंद गण्यारपवार, राजेश बाळराजे, जिल्हा निरिक्षक ताराचंद शेळके, विनोद खोबे, क्रिष्णा खरकाटे, रामकृष्ण तामशेट्टीवार, घनश्याम फुलकंवर, किशोर कुमरे, बाळू गुरफुले, पुरूषोत्तम कामठे, सुरेश सहारे, दिलीप मांदाडे, संतोष लोणारे, सत्तू सातपुते, सुनील देशमुख, तुळशीदास कुत्तरमारे, वनिता खरवडे, जयप्रकाश हर्षे, संगीता हर्षे, मदन राजुरकर, विजय खरवडे, लोमेश बुरांडे, प्रदीप वानखेडे, प्रमोद दुधबळे, रवी आक्केवार, सुनील दुधबळे, पुनेश वासेकर, अशोक भांडेकर, दिलीप कोठारे, बंडूजी चलाख, पुरूषोत्तम भांडेकर, गुरूदास गुरनुले, गजानन पिपरे, प्रेमिला काटींगे, मुक्तेश्वर अनंतरवार, गजानन देवतळे, रंजना दुधबळे यांच्यासह शेकडो गुरूबंधू व गुरूभगिनी सहभागी झाले होते.
दुपारी ३.३० वाजता शोभायात्रा बाजार चौकातील सांस्कृतिक भवनात पोहोचली. या ठिकाणी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आरती करण्यात आली. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संप्रदायचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व चामोर्शी येथील नागरिकांनी सहकार्य केले.
झांकी ठरले आकर्षण
अहेरी तालुक्यातर्फे शिवाजी महाराज, झांशीची राणी, संत गाडगेबाबा यांची झाकी तयार केली होती. गडचिरोली तालुकातर्फे राम-सीता-लक्ष्मण, हनुमान, आरमोरी तालुक्यातर्फे गजानन महाराज, देसाईगंज तालुक्यातर्फे शिवाजी महाराज, चामोर्शी तालुकातर्फे कलशधारी व गुढीधारी महिलांची झाकी होती. गोंडी नृत्य, ढोल ताशेही आकर्षण ठरले.

Web Title: Shobhayatre with Charmshi Nagari Dummundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.