शिवकालीन बंधारे ठरू शकतात तालुक्यासाठी वरदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:40 PM2018-03-22T22:40:19+5:302018-03-22T22:40:19+5:30

देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाऱ्यांवरील अनेक गावांना गाढवी नदीमुळे पाणी पुरवठा होतो.

Shiva Bandar can be a boon for taluka! | शिवकालीन बंधारे ठरू शकतात तालुक्यासाठी वरदान !

शिवकालीन बंधारे ठरू शकतात तालुक्यासाठी वरदान !

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीटंचाईवर योग्य नियोजन हवे : देसाईगंज तालुक्यात चार ठिकाणी बंधाऱ्यांची गरज

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी/विसोरा : देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक गावांना गाढवी नदीमुळे पाणी पुरवठा होतो. परंतु ही नदी हंगामी स्वरूपाची असल्याने आणि मागील काही वर्षापासून पर्जन्यमानात घट झाल्याने नदीचा प्रवाह फेब्रुवारीच्या शेवटी बंद होऊन ती कोरडी पडते. यावर उपाय म्हणून शिवकालीन बंधारे बांधल्यास उन्हाळ्यातही पाणी मिळणे शक्य होणार आहे.
देसाईगंज तालुक्यात उत्तर सीमेतून बोळधा या गावाजवळ गाढवी नदी प्रवेश करून तिथून पुढे बोळधा, कोरेगाव, एकलपूर, चोप, विसोरा, शंकरपूर, तुळशी, कोकडी, किन्हाळा-मोहटोला, डोंगरगाव, झरी-फरी, अरततोंडी या किनाºयालगतच्या गावातील शेतजमिनीला पाणी पुरवते. एकुणच देसाईगंज तालुक्यातील कृषी क्षेत्राला जलपुरवठा करून त्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांना जीवन देणारी ही सरीता तालुक्यासाठी वरदान आहे.
गाढवी नदीच्या किनाऱ्याजवळच्या गावातील शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत, गावकरी यांच्या श्रमदानातून दरवर्षी वनराई बंधारे बांधतात. त्यामुळे काही प्रमाणात फायदा होतोही, परंतु जर या नदीवर बोळधा कोरेगाव, एकलपूर, तुळशी, अरततोंडी या गावाशेजारी कायमस्वरूपी शिवकालीन बंधारे बांधले तर देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येणार नाही.
शासनाच्या नियमानुसार एखाद्या ठिकाणापासून एक कि.मी. अंतरावरु न पाणी आणावे लागत असेल, तसेच प्रतिदिवशी दरडोई २० लिटरपेक्षा कमी पाणी मिळत असेल तर त्याला पाणी टंचाई म्हणतात. तशी परिस्थिती तालुक्यात कुठेही नाही. परंतु शासन नियमानुसार वर्तमानात असलेल्या सार्वजनिक विहीरी, हातपंप, नळ जलसाठयांपासून पाचशे मीटर अंतरावर ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय दुसरे नवीन जलस्त्रोत खोदण्यास मनाई आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी व आता उपविभागीय अधिकारी यांना जलसाठे संरक्षित करण्याचे अधिकार आहे. दरवर्षी संबंधित अधिकारी जलसाठयांना संरक्षित करतात. परंतु ग्रामपंचायतस्तरावर काही ठिकाणी दुर्लक्ष होते. त्यामुळे अवैध जलउपसा होतो. परिणामी कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. तालुक्यातील जलसाठ्यांवर ग्रामस्तरावरु न योग्य नियंत्रण ठेवल्यास व जलसाठ्यातील गाळ कचरा काढण्याच्या कामाला प्राधान्य दिल्यास पाणी टंचाईला सामना करण्याची परीस्थिती उद्भवू शकणार नाही.
गावातील शासकीय हातपंप बिघडल्यास त्या हातपंपांना दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून खर्च होणारी हातपंप देखभाल दुरु स्ती योजना कार्यांन्वित आहे. प्रतिहातपंप ग्रामपंचायतला संपूर्ण वर्षासाठी दोन हजार रु पये भरावे लागते. मात्र देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या १९ ग्रामपंचायतवर हातपंप, वीजपंप आकारणीची रक्कम थकीत असल्याचे दिसते. नाममात्र रकमेचाही भरणा ग्रामपंचायतस्तरावरु न होताना दिसत नाही.
भविष्यातील पाण्याचे नियोजन म्हणून गाढवी नदीवर शिवकालीन बंधारे बांधल्यास किनाऱ्याजवळील गावांना निश्चित वरदान ठरेल. यासाठी या भागाच्या लोकप्रतिनीधींनी लक्ष देऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.
नियोजनासाठी गावकऱ्यांचे सहकार्य गरजेचे
सद्यस्थितीत देसाईगंज तालुक्यातील ३० महसुली गावे व ६ रिठ लक्षात घेता १४ ठिकाणी नळयोजना असून एका गावातील नळयोजना बंद आहे. १३ ठिकाणी दुहेरी पंपयोजना व दोन ठिकाणी विजपंप सुरु आहेत. देसाईगंज तालुक्याची पाणीपातळी यावर्षी खाली गेली आहे. विहिरी, हातपंप, दुहेरी पंपयोजना व काही गावांसाठी असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यांची संख्या पाहता यावर्षी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

पाणी हे जीवन आहे, त्याचे महत्व ओळखून पाणीपट्टी कर भरण्यास ग्रामपंचायतला लोकांनी सहकार्य केल्यास, ग्रामपंचायतने जलस्त्रोतांचा उपसा केल्यास, गावांचे हित लक्षात घेत अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. त्यासाठी जनजागृती करणेही गरजेचे आहे.

Web Title: Shiva Bandar can be a boon for taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.