कपड्यांच्या आड दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:17 AM2019-05-27T00:17:06+5:302019-05-27T00:17:34+5:30

दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची खरेदी करून आष्टी येथे या दारूची विक्री करणाऱ्यास महागाव खुर्द येथील तंटामुक्त समिती व मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. अली अख्तर अंजुमन असे दारूची वाहतूक करून विक्री करणाºयाचे नाव आहे.

Sell clothes and liquor | कपड्यांच्या आड दारूविक्री

कपड्यांच्या आड दारूविक्री

Next
ठळक मुद्दे४० लिटर दारू जप्त : महागाव खुर्दजवळ तंटामुक्त समिती व मुक्तिपथची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची खरेदी करून आष्टी येथे या दारूची विक्री करणाऱ्यास महागाव खुर्द येथील तंटामुक्त समिती व मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले.
अली अख्तर अंजुमन असे दारूची वाहतूक करून विक्री करणाºयाचे नाव आहे. या इसमाकडून ४० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. महागाव खुर्द नजीक असलेल्या प्राणहिता नदीपात्रात गावातील अनेक जण दारू गाळतात. हा प्रकार थांबण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या गाव संघटनेच्या सभेत या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्याविषयी चर्चा करण्यात आली. गावात उघड दारूविक्री होत नसून वेगवेगळ्या मार्गाने ती सुरू आहे. शनिवारी गावात एक इसम दुचाकीवरून कपडे विक्री करीत होता. पण त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. हा इसम गावातून गावठी दारू विकत घेऊन कपड्याच्या पिशवीत लपवून बाहेरगावी विक्रीस नेत असल्याचे लक्षात आले. इसमाने पळ काढताच महागावचे पोलीस पाटील आणि इतरही ग्रामस्थांनी या इसमाचा पाठलाग करून त्याला गाठले. त्याची झडती घेतली असता कपड्याच्या पिशवीत लपविलेल्या गावठी दारूच्या सहा पिशव्या आढळल्या.
महागाव येथून दारू विकत घेऊन ती आष्टी शहरात विकत असल्याची कबुली या इसमाने दिली. तात्काळ अहेरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अहेरी पोलिसांनी इसमाजवळील दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. गावात येणाºया प्रत्येक विक्रेत्यांवर आता पाळत ठेवणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच गावातील अवैध दारू विक्री करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

जंगलात व नदीलगत अड्डे
मोहफूल व गुळापासून दारू गाळण्याकरिता घनदाट जंगल व नदीचे काठ यासारखे सुरक्षित स्थळ निवडले जाते. या ठिकाणीच दारू गाळून गावात अथवा गावाबाहेर दारूची विक्री होत असते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारची दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनाही अंदाज येत नाही.

Web Title: Sell clothes and liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.