१२ वर्षानंतर होणार रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:13 AM2018-03-18T00:13:13+5:302018-03-18T00:13:13+5:30

देसाईगंज तालुक्यातील कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे व भगदाड पडले होते. या रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी मागील १२ वर्षांपासून शासन, प्रशासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता.

Road work will take place after 12 years | १२ वर्षानंतर होणार रस्त्याचे काम

१२ वर्षानंतर होणार रस्त्याचे काम

Next
ठळक मुद्देनिधी मंजूर : कुरूड मार्गाची दुर्दशा; रस्त्यावर ठिकठिकाणी पडले भगदाड

ऑनलाईन लोकमत
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे व भगदाड पडले होते. या रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी मागील १२ वर्षांपासून शासन, प्रशासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून रस्त्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ जि.प. सदस्य रोशनी पारधी यांच्या हस्ते करण्यात आला.
रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पं.स. सभापती मोहन गायकवाड, देसाईगंजचे न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सरपंच मारोती मडावी, कुरखेडा न.पं. चे पाणीपुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक राजू जेठानी, पं.स. सदस्य अर्चना ढोरे, ग्रा.पं. सदस्य दादाजी भर्रे, ग्रा.पं. सदस्य सुनील पारधी, अभियंता अतुल बगी, विलास गोटेफोडे उपस्थित होते.
देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गापासून दोन किमी अंतरावरील रस्त्यावरून पावसात पावसाचे पाणी व ईटियाडोहाच्या नहराचे पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडले होते. तसेच पिल्लारे यांच्या घराजवळ पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नव्हता. येथे अनेकदा जीवघेणे अपघातही घडले. यंदाच्या पावसाळ्यात या मार्गाची आणखी स्थिती बिकट झाली. या रस्त्यावर पावसाळ्यात अनेकदा अपघात घडले. सदर रस्ता गावकºयांसाठी धोकादायक ठरू लागला. अखेर या रस्त्याच्या बांधकामासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला. जि.प. सदस्य रोशनी पारधी यांनी पुढाकार घेतल्याने निधी मंजूर झाला.
या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले असून मुख्य राज्य मार्ग ११ ला जोडणाºया रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व स्लॅब ड्रेनच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे.
मंजूर निधी दोनदा गेला परत
कुरूडच्या रस्त्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन तत्कालीन जि.प. बांधकाम सभापती रमाकांत ठेंगरी यांनी २२ लाख रूपये मंजूर करवून बांधकामाला हिरवी झेंडी दाखविली होती. परंतु तथाकथीत राजकारण्यांच्या विरोधामुळे तत्कालीन स्थितीत बांधकाम होऊ शकले नाही. त्यानंतर जि.प. सदस्य रेखा मडावी यांनीही या रस्त्याच्या बांधकामाकरिता प्रयत्न केले होते. तेव्हाही काही राजकारण्यांच्या विरोधामुळे रस्त्याचे बांधकाम होऊ शकले नाही व निधी परत गेला.

Web Title: Road work will take place after 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.