बंद पाळायला बाध्य कराल तर याद राखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:12 AM2018-12-03T00:12:35+5:302018-12-03T00:13:38+5:30

सप्ताहाच्या नावाखाली दहशत निर्माण करू नका. नक्षल सप्ताह पाळायला भाग पाडाल तर याद राखा. आम्ही तुमचे गुलाम नाही. नक्षल सप्ताहाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करणे थांबवा, असे खुले आव्हान पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड या नक्षलग्रस्त भागातील गावकºयांनी नक्षलवाद्यांना दिले आहे.

Remember to bounce off! | बंद पाळायला बाध्य कराल तर याद राखा!

बंद पाळायला बाध्य कराल तर याद राखा!

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांचे नक्षल्यांना आव्हान : बॅनरची केली जाळपोळ, नक्षल्यांविरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सप्ताहाच्या नावाखाली दहशत निर्माण करू नका. नक्षल सप्ताह पाळायला भाग पाडाल तर याद राखा. आम्ही तुमचे गुलाम नाही. नक्षल सप्ताहाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करणे थांबवा, असे खुले आव्हान पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड या नक्षलग्रस्त भागातील गावकºयांनी नक्षलवाद्यांना दिले आहे.
नक्षलवाद्यांमुळे दुर्गम भागाचा विकास रखडला असल्याची बाब आता तेथील निरक्षर नागरिकांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा विरोध करण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे. पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड ही गावे नक्षलग्रस्त आहेत. येथील नागरिक नक्षल्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झाले आहेत. २ डिसेंबरपासून पीएलएजीए सप्ताहानिमित्त बंद पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले होते. मात्र गावकºयांनी नक्षल्यांच्या बदंचा विरोध करून नक्षल्यांनाच आव्हान दिले. नक्षल्यांनी अनेक वर्षांपासून आमच्या अज्ञानाचा फायदा घेत आम्हाला जाणीवपूर्वक शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बाबतीत जगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. नक्षलवाद्यांचा फोलपणा लक्षात आला असून यानंतर आम्ही नक्षलवादास कदापी साथ देणार नाही. नक्षलवाद्यांना आमचा विकास नकोसा असून त्यांनी आमच्यावर फक्त अन्याय, अत्याचारच केला आहे. मागील अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांची अत्यंत क्रुरपणे, निर्घृण हत्या करणे, विकास कामांवरील वाहनांची जाळपोळ करणे या घटनांच्या माध्यमातून आमच्या दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याची जाणीव आता आम्हाला होण्यास सुरूवात झाली आहे.
अशी संतप्त प्रतिक्रिया गावकºयांनी व्यक्त केली. त्याचबरोबर गावात नक्षल्यांनी बांधलेल्या नक्षल बॅनरची होळी करून नक्षल्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

Web Title: Remember to bounce off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.